आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China President Xi Jinping House Arrest Rumors ।Fake News On Social Media । China President Public Appearance After Return From Samarkand SCO Summit

10 दिवसांनी दिसले जिनपिंग:सोशलवर सुरू होत्या नजरकैदेच्या अफवा; पुढच्या महिन्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती निवडले जाण्याची शक्यता

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय कोऑपरेशन समिट म्हणजेच SCO समिटहून परतल्यानंतर 10 दिवसांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग सोमवारी दुपारी पहिल्यांदा दिसले. जिनपिंग सरकारी टीव्हीवर दिसले. ते दिसून येणे यासाठी महत्त्वाचे आहे कारण, अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अशा अफवा होत्या की, जिनपिंग यांना चीनच्या सैन्याने (पीपल्स रिपब्लिक आर्मी म्हणजेच PLA) नजरकैदेत ठेवले आहे.

जिनपिंग यांच्यावर जगभरातील नजरा असण्याचे आणखी एक कारण म्हणजे पुढच्या महिन्यात चायना कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच CPCची वार्षिक मीटिंग होत आहे. असे मानले जात आहे की, या मीटिंगमध्ये जिनपिंग यांच्या राष्ट्रपती म्हणून तिसऱ्या कार्यकाळावर मोहोर उमटू शकते. तथापि, असे होणे आता कठीण होत चालले आहे.

सरकारी कार्यक्रमात दिसून आले

वृत्तसंस्था APच्या एका रिपोर्टनुसार- जिनपिंग अनेक दिवसांनी बीजिंगमध्ये दिसून आले. ते एका सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले आणि याचे फुटेज सरकारी टीव्हीवर टेलिकास्ट करण्यात आले. अनेक दिवसांपर्यंत दिसून न आल्याने जिनपिंग यांच्यावरून अनेक प्रकारचे कयास लावले जात होते.

चिनी राष्ट्रपतींसह या कार्यक्रमात पंतप्रधान ली किकियांग आणि पक्षातील काही नेतेही हजर होते. याशिवाय चिनी सैन्याचे काही अधिकारीही येथे दिसून आले. या कार्यक्रमात चीनच्या आर्थिक विकासावर चर्चा झाली.

हा फोटो चीनच्या सरकारी टीव्हीने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत इतर लोकही दिसत आहेत. जिनपिंग तब्बल 10 दिवसांनंतर सार्वजनिकरीत्या दिसले आहेत.
हा फोटो चीनच्या सरकारी टीव्हीने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत इतर लोकही दिसत आहेत. जिनपिंग तब्बल 10 दिवसांनंतर सार्वजनिकरीत्या दिसले आहेत.

समरकंदहून परतल्यानंतर दिसले नव्हते

जिनपिंग 16 सप्टेंबरला उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये SCO समिटमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. ही दोन वर्षांनंतर त्यांची पहिली परदेशी भेट होती. समरकंदमध्ये 2 दिवस थांबल्यानंतर जिनपिंग बीजिंगला परतले आणि त्यानंतर ते कोणत्याही कार्यक्रमात दिसून आले नव्हते.

सोशल मीडियावर म्हटले जात होते की, चिनी सेना जिनपिंग यांच्यावर नाराज आहे आणि यामुळेच त्यांना हाऊस अरेस्ट करण्यात आले आहे. तथापि, चीनमध्ये कोरोनाच्या काळात हा नियम आहे की, परदेशातून परतल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला 7 दिवस क्वारंटाइन राहावे लागते. सध्या, असा कोणताही नेता नाही जो जिनपिंग यांना थेट आव्हान देत असेल. असे म्हटले जात आहे की, ते त्यांच्या मनाला वाटेल तोपर्यंत राष्ट्रपतिपदी राहू शकतात.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे पंचवार्षिक अधिवेशन 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये जिनपिंग यांना पुन्हा एकदा पाच वर्षांची मुदतवाढ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे पंचवार्षिक अधिवेशन 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये जिनपिंग यांना पुन्हा एकदा पाच वर्षांची मुदतवाढ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

पुढचा महिना महत्त्वाचा

  • चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे पंचवार्षिक अधिवेशन 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये जिनपिंग यांना पुन्हा एकदा 5 वर्षांची मुदतवाढ मिळणार असल्याचे मानले जात आहे. सहसा चीनचा राष्ट्राध्यक्ष दोन टर्मसाठीच निवडला जातो, मात्र या प्रकरणात जिनपिंग अपवाद मानले जात आहेत.
  • काही दिवसांपूर्वी पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी म्हटले होते की, जिनपिंग यांच्या काळात चीनचे शेजारी आणि दूरच्या देशांशी असलेले संबंधही बिघडले आणि जगात एक संधीसाधू शक्ती म्हणून चीनकडे पाहिले गेले. याशिवाय तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिकेशी थेट सामना सुरू आहे.
  • चीनची अर्थव्यवस्था रिअल इस्टेटवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, परंतु हे क्षेत्रदेखील खूप कमकुवत झाले आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीजने आर्थिक आघाडीवर 3.5% विकास दराचा अंदाज दिला आहे. या सर्व बाबी पाहता जिनपिंग यांच्या नेतृत्वाचा प्रश्न पक्षाच्या बैठकीत उपस्थित होणे निश्चित मानले जाऊ शकते.
  • वृत्तसंस्थेनुसार, चीनमध्ये सत्तापालट झाल्याच्या अफवा याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत. यावेळी जिनपिंग हे भ्रष्टाचारविरोधी अभियानाच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या अनेक विरोधकांना तुरुंगवास भोगावा लागला आहे.
बातम्या आणखी आहेत...