आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीजिंग:चीनने दिग्गज तंत्रज्ञांच्या यादीतून काढले अलिबाबाच्या जॅक मांचे नाव

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनचे दिग्गज उद्योगपती जॅक मा यांचे वाईट दिवस अजून संपलेले नाहीत. आता चिनी सरकारने त्यांचे नाव तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज प्रतिनिधींच्या यादीतून काढून टाकल्याची बातमी आहे.

वृत्तानुसार, चीनच्या सरकारी संस्था ‘शांघाई सिक्युरिटीज न्यूज’ ने पहिल्या पानावर देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांची यादी छापली आहे. यात अलिबाबा या बहुराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक जॅक मा यांच्या नावाचा समावेश नाही. यादीत हुवेई टेक्नॉलॉजीजच्या रेन झेंगफेई, शाओमी कॉर्पच्या लेई जून आणि बीवायडीच्या वांग चुआनफू या दिग्गजांचा समावेश आहे. त्यांच्या योगदानाचे कौतुक झाले. बीजिंगचे अधिकृत वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ नेदेखील आपल्या अग्रलेखातही यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे याच दिवशी जॅक मा यांच्या अलिबाबा समूहानेही त्यांच्या मिळकतीविषयी सार्वजनिक माहिती दिली होती. जॅक मा गेल्या वर्षाभरापासून चीनच्या शी जिनपिंग सरकारच्या निशाण्यावर आहेत. त्यांनी तेव्हापासून अनेक प्रसंगी देशाच्या वित्तीय नियामक आणि बँकिंग प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

बातम्या आणखी आहेत...