आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनपासून आणखी एक धोका:बर्ड फ्लूचे ‘एच 10-एन 3’ स्वरूप आता मानवात आढळल्याने चिंता, पूर्व जिआंगसू प्रांतात आढळला रुग्ण

बीजिंग17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनपासून आणखी एका धोक्याचे संकेत मिळाले आहेत. तेथे बर्ड फ्लूचे “एच १०-एन ३’ स्वरूप (व्हेरिएंट) मानवात आढळले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी एका व्यक्तीला या स्वरूपाची बाधा झाल्याची माहिती दिली.

आयोगानुसार, पूर्व जिआंगसू प्रांतात ४१ वर्षीय व्यक्ती २८ मे रोजी बर्ड फ्लूच्या “एच १०-एन ३’ स्वरूपाद्वारे बाधित झाल्याचे आढळले. त्याला ही बाधा कशी झाली याची माहिती आयोगाने दिली नाही. जगात बर्ड फ्लूचा मानवात संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण या वर्षी रशियात समोर आले होते. तो बर्ड फ्लू अपेक्षेपेक्षा कमी घातक एच ५ एन ८ व्हेरिएंट होता. “एच १०-एन ३’ व्हेरिएंट थोडा जास्त घातक मानला जात आहे. चीनचे सरकारी चॅनल सीझीटीएन टीव्हीनुसार, “एच १०-एन ३’च्या पीडितावर झेंजियांग शहरात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती ठीक आहे. त्याला लवकरच रुग्णालयातून सुटी मिळू शकते. चीनचे आरोग्य अधिकारीही सध्या “एच १०-एन ३’चा संसर्ग मानवापर्यंत पोहोचल्याच्या घटनेला जास्त महत्त्व देत नाहीत. त्यांच्या मते, या राेगाची महामारी फैलावण्याची जोखीम कमीच आहे.

एकापासून दुसऱ्यात संसर्ग नाकारता येत नाही : धारीवाल
बर्ड फ्लूचे हे नवे स्वरूप आहे. ते एका व्यक्तीपासून दुसऱ्यात संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, सध्या त्याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्यामुळे ठोसपणे काही सांगता येऊ शकत नाही. बर्ड फ्लूच्या “एच १०-एन ३’ स्वरूपाने पीडित रुग्णात ओसेलटामाविर साल्टचा वापर केला जाऊ शकतो. - डॉ. ए. सी. धारीवाल, माजी संचालक, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल प्रोग्राम

बातम्या आणखी आहेत...