आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China Wuhan Road Accident Video; Dangerous Road Accident | Peoples Daily | Xi Jinping | China Accident

10 मिनिटांत 50 वाहने एकमेकांवर आदळली:चीनमध्ये भीषण रस्ता अपघात, 16 जणांचा मृत्यू तर 66 जण जखमी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक भीषण आणि विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. चीनच्या हुनान प्रांतात शेकडो गाड्या एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाला आहे यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून66 जण जखमी झाले आहेत. यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताच्या वेळी महामार्गावर 10 मिनिटांत 50 वाहने एकमेकांवर आदळल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक वाहनांनी पेट घेतला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर या अपघाताचो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. या फोटो आणि व्हिडीओवरून हा अपघात किती भीषण आणि विचित्र प्रकारे घडला आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

अनेक वाहने एकमेकांवर आदळली आहेत.
अनेक वाहने एकमेकांवर आदळली आहेत.

चीनच्या मीडिया हाऊस पीपल्स डेलीने घटनेचा व्हिडिओ शेअर करून माहिती दिली आहे. ट्रकला भीषण आग लागल्याने आणि अपघातामुळे गोंधळ निर्माण झाला. या अपघातामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पूल जाम झाल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पूल जाम झाल्याचे दिसत आहे.

रस्ता अपघातानंतर पोलिसांनी निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले की, अनेक वाहनांची टक्कर झाली. ज्यामध्ये अनेक वाहने एकमेकांवर आदळली. हा अपघात कसा घडला आणि एकाच वेळी एवढ्या वाहनांची धडक कशी झाली, याचा तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चीनमध्ये पुलावर धडकली 200 वाहने

चीनमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुक्यामुळे येथे सुमारे 200 वाहने एकमेकांना धडकली आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.