आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • China Rude Response To Women On The Internet; Account Closed; There Is No Mechanism To Hear Arguments; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रोलमुळे त्रस्त:चीन - इंटरनेटवर महिलांशी असभ्य भाषेत प्रतिसाद; अकाउंट बंद; कैफियत ऐकणारी यंत्रणा नाही

सुई ली वी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला सशक्तीकरणाबद्दल बोलणाऱ्यांना सोशल मीडियावरून मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागत आहे.

चीनमध्ये महिलांना विरोध करण्याची नवीन पद्धत पाहायला मिळू लागली आहे. महिला सशक्तीकरणाबद्दल बोलणाऱ्यांना सोशल मीडियावरून मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. त्यातही महिलांची स्थिती चिंताजनक आहे. कारण ट्रोल होत असलेल्या महिलांची तक्रार मात्र कोणीही ऐकायला तयार नाही. उलट सोशल मीडिया कंपन्या महिलांना अशा प्लॅटफॉर्मवरून हटवू लागल्या आहेत. म्हणजेच महिलांचा आवाज दाबण्याची नवीन पद्धत समोर येत आहे.

चीनमधील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विबोवर चॅटदरम्यान एका यूजरने महिलांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासंबंधी मार्गदर्शन मागितले. विबोचे सीईआे वांग गाफी देखील त्यात सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर याबाबतच्या टिप्सदेखील जोडण्यात आल्या. तक्रारीच्या वर्गवारीत द्वेष, लैंगिक भेदभावाचा पर्याय निवडा आणि तक्रार दाखल करा. त्या यूजरने या चॅटचा स्क्रिनशॉट शेअर करून अनेक ट्रोलरला त्याचा अंमल करण्याचाही सल्ला देण्यात आला.

चीनमध्ये सोशल मीडियातील महिलांचे अकाउंट गायब होण्याच्या घटना ३१ मार्चपासून सुरू झाल्या. सर्वात आधी चीनच्या प्रसिद्ध महिला कार्यकर्त्या शाआे मिलीचे अकाउंट हटवण्यात आले. त्यांनी चेंग्डूतील एका रेस्तराँमध्ये झालेल्या गैरवर्तनाला सोशल मीडियातून चव्हाट्यावर आणले होते. त्या म्हणाल्या, माझ्यासमोर बसलेला एक व्यक्ती रेस्तराँमध्ये मनाई असतानाही धूम्रपान करत आहे. अनेकवेळा विनंती करूनही त्याने ही बाब ऐकली नाही. त्यानंतर गरम कॉफीचा भरलेला कप फेकला. सोशल मीडियावर त्यास पोस्ट करण्यात आले. तेव्हा त्यांना वंशद्वेषासंबंधीचे अनेक फोन कॉल आले. अनेक लोकांनी त्यांच्यावर हाँगकाँगच्या स्वातंत्र्याचे समर्थक असा आरोपही केला. त्यानंतर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद झाले.तक्रारी ऐकण्याऐवजी महिलांना मुलभूत सिद्धांतांचा सन्मान करा, असे शिकवले जाते आहे.

बातम्या आणखी आहेत...