आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाचा हल्ला:यूक्रेनच्या शहरांमध्ये हाहाकार, दुकानांमधील साहित्य संपले मात्र ग्राहकांच्या लांबच लाब रांगा; अनेक ठिकाणी लूटमार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर येथे भयंकर दहशत निर्माण झाली आहे. युक्रेनमधून मिळालेल्या माहितीनुसार, येथील बहुतांश किराणा दुकानांमध्ये माल संपला आहे, मात्र असे असतानाही येथे लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोकांना भीती वाटतेय की युद्ध दीर्घकाळ चालेल आणि त्यांच्यावर उपासमारीची परिस्थिती येईल. अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे दुकानातून माल न मिळाल्याने लोकांनी लूट सुरु केली आहे.

शहरात पोलिसही नाहीत
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यानंतर रस्त्यावर एकही पोलिस नाहीये. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकप्रकारे येथे पूर्ण हाहाकार माजण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंद दुकानांमध्येही लोक लूटमार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याठिकाणीही सरकारविरोधात प्रचंड रोष आहे.

डेन्प्रो येथे उपस्थित रशियन भाषेचे लेक्चरर वेनस्तेसिया म्हणाले - आम्ही भीतीच्या छायेत जगत आहोत. आता कुणाच्याही आयुष्यात भरवसा उरला नाही. अनेकांच्या घरात आधीच अन्नाचा तुटवडा आहे. चर्चेतून हे प्रकरण सुटेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. आता रशियाने हल्ला केला आहे. आम्ही घरात राहिलो तरी मारले जाऊ आणि बाहेर गेलो तरी बॉम्बचे बळी होऊ. जग फक्त बोलत राहिले. आमच्यासोबत कोणीही आले नाही.

युक्रेनने जगाला मदतीचे आवाहन केले
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केल्याची घोषणा केल्यानंतर UN मध्ये यूक्रेनी राजदुत सर्जी किस्लित्सिया हे भावुक झाले आणि त्यांनी आपल्या देशाला वाचवण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, आम्हाला वाचवा. रशिया आमच्या भागाला उद्धवस्त करुन टाकेल. त्यांनी म्हटले की, येथे बसुन शांतीविषयी बोलत आहे आणि दुसरीकडे आमच्या भागांमध्ये सैन्य पाठवत आहे.

भारतातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर विविध शहरांतील विद्यापीठांमध्ये शिकणारे हजारो भारतीय विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. यातील अनेक विद्यार्थी त्यांच्या हॉस्टेल आणि घरात लपून बसले आहेत. कीव स्टेशनच्या 15 किमी आधी ट्रेन थांबवण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...