आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील 40% धूम्रपान करणारे चीनमधील लोक आहेत. लॅन्सेट जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, धूम्रपान करणाऱ्या लोकांना जे लोक धूम्रपान करित नाही, अशा लोकांपेक्षा 56 आजारांचा सर्वाधिक धोका असतो. यामध्ये हृदय, मेंदू, यकृत आणि डोळ्यांच्या आजारांपासून अनेक प्रकारच्या कर्करोगाचा देखील समावेश होतो. ही सर्व बाब संशोधनाचतून समोर आली आहे.
20 वर्षापूर्वी धूम्रपानाचे व्यसन
हे संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अनेक चिनी संशोधन संस्थांनी संयुक्तपणे केले आहे. यासाठी चायना कदुरी बायोबँकचा डेटा वापरण्यात आला. अभ्यासात, सुमारे 11 वर्षे 5 लाख 12 हजारांहून अधिक लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये सुमारे 3 लाख महिला होत्या, परंतु नियमित धूम्रपान करणाऱ्यांपैकी 74.3% पुरुष होते. अभ्यासात सहभागी संशोधक लिमिंग ली यांनी सांगितले की, चीनमधील दोन तृतीयांश पुरुष वयाच्या 20 वर्षांच्या आधीच सिगारेटचे व्यसन करतात. यातील निम्मे लोक धूम्रपान न सोडल्यास व्यसनामुळे आपला जीव गमावतात. चीनमध्ये धूम्रपानामुळे दरवर्षी 10 लाख लोकांचा मृत्यू होतो. म्हणजेच दररोज सरासरी ३ हजार लोकांचा मृत्यू होत आहे.
धूम्रपानामुळे स्वरयंत्राच्या कर्करोगाचा धोका 216% वाढतो
शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, ज्यांनी आयुष्यात कधीही सिगारेट ओढली नाही, अशा लोकांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांना कोणताही आजार होण्याचा धोका 10% जास्त असतो. स्वरयंत्राच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका असतो. त्याचा धोका 216% पर्यंत आहे. स्वरयंत्राला आवाज बॉक्स किंवा घसा म्हणतात. नियमित धूम्रपान करणाऱ्यांना एकूण 56 आजारांचा धोका असतो. यापैकी 50 आजार पुरुषांना तर 24 आजार महिलांना बळी ठरू शकतात. तसेच 22 आजारांमुळे मृत्यू होऊ शकतो. यापैकी 17 पुरुष आणि 9 महिलांचा मृत्यू होऊ शकतो. या आजारांमध्ये 10 हृदयविकार, 14 श्वसनाचे आजार, 14 कर्करोग, 5 पोटाचे आजार आणि 13 इतर आजार जसे मधुमेह आणि मोतीबिंदू यांचा समावेश आहे.
योग्य वेळी धूम्रपान सोडणे फायदेशीर आहे
संशोधनाचे निष्कर्ष सांगतात की, ज्या लोकांनी आजार होण्यापूर्वी धूम्रपान सोडले होते, त्यांना पुढील 10 वर्षांनंतर सामान्य लोकांप्रमाणेच आजारांचा धोका होता. म्हणजेच, योग्य वेळी धूम्रपान सोडल्यास, आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकतो. संशोधनात सहभागी असलेले प्राध्यापक झेंगमिंग चेन म्हणतात की, चीनमध्ये सिगारेटच्या किमती वाढवून आणि पॅकेटवर प्रभावी इशारे देऊन लाखो जीव वाचवले जाऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.