आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी सक्ती:चीन झीरो कोविड धोरणावर कायम, तो सातत्याने नियम आणखी कठोर करतोय

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिनी तज्ज्ञ म्हणाले- आम्ही दुसऱ्यांसारखे हा आजार स्थायी असल्याचे म्हटले नाही

चीनच्या कोरोना प्रतिबंध सरकारी समितीने अर्थव्यवस्था आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी संक्रमण लवकरात लवकर संपुष्टात आणण्यावर भर दिला आहे. या समितीचे नेतृत्व करत असलेल्या आणि महामारी तज्ज्ञ लियांग वानियन यांनी एका मुलाखतीत म्हटले की, चीनने आजवर प्रभावीरीत्या सामुदायिक कोविड रुग्णसंख्या नियंत्रित केली आहे. गंभीर संक्रमण आटोक्यात ठेवले आहे. त्यांनी कोरोनावर सरकारच्या झीरो टॉलरन्स धोरणाचा बचाव करताना म्हटले की, केवळ सक्तीच महामारी नियंत्रित करण्याचा सर्वांत चांगला उपाय आहे. दुसऱ्या देशांप्रमाणे आम्ही हा आजार पॅनडेमिकहून एंडेमिक बनेल असा कधीच विचार केला नाही. सक्तीनंतरही चिनी अर्थव्यवस्थेला अपाय झालेला नाही. लिआंग यांच्या टिप्पणीमुळे स्पष्ट होते की, चीन कोविड झीरोचे धोरण सुरूच ठेवेल. याअंतर्गत २०१९ मध्ये वुहानमध्ये व्हायरस पसरल्यानंतर कठोर निर्बंध लावले होते.

मालकाला न विचारता पाळीव प्राण्यांना ठार मारले जात आहे
शांगराव शहरात स्थानिक प्रशासनाने एका महिलेच्या तक्रारीला उत्तर देण्यासाठी एक निवेदन जारी केले आहे. यात महिलेने म्हटले होते की, तिला वाटत आहे की, जेव्हा ती हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन होती, तेव्हा तिच्या कुत्र्याला ठार मारण्यात आले. सरकारी निवेदनात म्हटले की, परिसरातील कीटकनाशक फवारणी कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार जनावरांवर अँटिरॅबिज उपचार करण्यात आले. दरम्यान, चीनने सीमावर्ती भागातही निगराणी वाढवली आहे.

डालियान शहरात कोरोना पसरल्यानंतर हजारो विद्यार्थी विद्यापीठात कैद
चीनच्या डालियान शहरात ४ नोव्हेंबरपासून दररोज २४ रुग्ण आढळत आहेत. येथील प्रशासनाने सांगितले की, या पूर्वोत्तर चिनी शहरात हॉटस्पॉट तयार झाल्यानंतर डालियान विद्यापीठ परिसरात हजारो विद्यार्थी बंद आहेत. कोरोना प्रकोपाची गती कमी होत आहे. महामारीही आता नियंत्रणात आहे. बीजिंगमध्ये निगेटिव्ह रिपोर्टशिवाय प्रवेश शक्य नाही. रशिया जवळील शहर हीहेमध्ये कोरोना संसर्गास जबाबदार लोकांची माहिती देणाऱ्यास १५ लाखांचे बक्षीस आहे.

बाधिताच्या १ किमी क्षेत्रात येणारे लोक क्वाॅरंटाइन होणार
चीनमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान कोरोनाचे १२८० रुग्ण आढळले. हे रुग्ण २१ राज्यांतून आढळले. दुसऱ्या देशांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. परंतु चीन झीरो टॉलरन्स धोरण राबवत आहे. आता जवळील संपर्काचे अंतर १ किमी करण्यात आले. याचाच अर्थ असा की, संक्रमित व्यक्तीच्या एक किमीपर्यंतच्या लोकांना चाचणी करावी लागेल व त्यांना क्वॉरंटाइन व्हावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...