आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China Super Cow Cloning Process Explained | | Chinese Scientists Made Super Cows | Cloning | Super Cow

चीनने क्लोनिंगद्वारे तयार केली सुपर काऊ:एका दिवसात देते 140 लिटर दूध, पुढील 2 वर्षांत अशा 1 हजार गायी जन्माला घालणार

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक फोटो- अमेरिकेसह अनेक देशांमध्ये प्राण्यांच्या क्लोनिंगचे प्रयोग केले जात आहेत.

चीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने विचित्र प्रयोग करत आहे. अलीकडेच चिनी शास्त्रज्ञांनी क्लोनिंगद्वारे 3 'सुपर काऊ' तयार केल्याचा दावा केला आहे. या गायी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन म्हणजेच 2 लाख 83 हजार लिटर दूध देऊ शकतात.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिन्ही गायींची ब्रीडिंग नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. निंग्झिया परिसरात गेल्या दोन महिन्यांपूर्वी या बछड्यांचा जन्म झाला. हे सर्व नेदरलँडमधून आलेल्या होल्स्टेन फ्रिशियन गायीचे क्लोन आहेत.

आधी जाणून घ्या, क्लोनिंग म्हणजे काय?

अलैंगिक पद्धतीने एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाला तयार करण्याच्या प्रक्रियेला क्लोनिंग म्हणतात. सोप्या भाषेत, शास्त्रज्ञ प्राण्याचा डीएनए घेतात आणि त्याच्या मदतीने प्राण्याचे प्रतिरूप तयार करतात. शास्त्रज्ञ त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या जनुकांमध्ये बदल करतात, ज्यामुळे सामान्य प्राण्यांपेक्षा अधिक शक्तिशाली प्राणी जन्माला घालता येतात.

चीनमध्ये 2017 मध्येही क्लोनिंगद्वारे गायींचा जन्म झाला आहे.
चीनमध्ये 2017 मध्येही क्लोनिंगद्वारे गायींचा जन्म झाला आहे.

चीनने गायीचे क्लोन कसे केले?

प्रोजेक्ट लीड जिन यापिंग यांनी सांगितले की, सर्वप्रथम चांगल्या जातीच्या गायींच्या कानाच्या पेशी (पेशी) काढण्यात आल्या. त्यानंतर यापासून भ्रूण तयार करून 120 गायींमध्ये रोपण करण्यात आले. यातील 42% गायी गाभण राहिल्या. सध्या तीन सुपर काऊंचा जन्म झाला आहे, तर येत्या काही दिवसांत 17.5% गायींचा जन्म होऊ शकतो.

एक सुपर काऊ दरवर्षी देते 18 टन दूध

शास्त्रज्ञांच्या मते, एक सुपर काऊ एका वर्षात 18 टन (16.3 हजार लिटर) दूध देण्यास सक्षम आहे. हे अमेरिकेतील सामान्य गायीपेक्षा 1.7 पट जास्त प्रमाण आहे. येत्या 2-3 वर्षांत चीनमध्ये एक हजार सुपर काऊंचे उत्पादन होईल, असे यापिंग सांगतात. याचा जास्तीत जास्त फायदा डेअरी उद्योगाला होईल. सध्या, चीनमध्ये प्रत्येक 10,000 गायींपैकी फक्त 5 गायी त्यांच्या आयुष्यात 100 टन दूध देऊ शकतात. याशिवाय देशातील 70 टक्के दुभत्या गायी आयात केल्या जातात.

चीनमध्ये वाढतेय प्राण्यांचे क्लोनिंग

चीनने प्राण्याचे क्लोन बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी चिनी शास्त्रज्ञांनी जगातील पहिला क्लोन केलेला आर्क्टिक लांडगा तयार केला. 2017 मध्ये चीनने गुरांचे क्लोन केले जे प्राण्यांमधील क्षयरोगाचा पराभव करू शकतात. अमेरिकेसह अनेक विकसित देशांमध्येही या तंत्रज्ञानावर काम सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...