आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीन आणि तैवानमधील संघर्ष वाढत चालला आहे. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानहून परतताच चीन अधिक आक्रमक झाला आहे. गुरुवारी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) तैवानच्या आसपासच्या 6 भागात लष्करी सराव सुरू केला.
चीनने या लष्करी सरावाला 'लाइव्ह फायरिंग' असे नावही दिले आहे. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या लष्करी कवायती तैवानच्या सीमेपासून अवघ्या 16 किमी अंतरावर केली जात आहे. यामध्ये शस्त्रे आणि दारूगोळा वापरला जात आहे. हा सराव 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यापूर्वी चीनकडून तैवानपासून 100 किमी अंतरावर या कवायती करण्यात येत होत्या. पण नॅन्सींच्या दौऱ्यानंतर त्यांनी हे अंतर कमी करून 16 किमीवर आणले आहे.
लष्करी सराव कुठे होत आहे ते नकाशावरून समजून घ्या...
चीन क्षेपणास्त्र चाचणीही करणार आहे
PLA इस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल शी यी सांगतात - या लष्करी सराव दरम्यान लाँग रेंज लाइव्ह फायर शूटिंग केले जाईल. यासोबतच क्षेपणास्त्राचीही चाचणी केली जाणार आहे. दुसरीकडे, तैपई चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून, आम्हाला कोणत्याही प्रकारचा तणाव नको आहे. देश अशा परिस्थितीच्या विरोधात आहे, ज्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. आम्हाला युद्ध नको आहे पण वेळप्रसंगी युद्धासाठी नक्कीच तयार राहू असे सांगितले आहे.
चीनचा लष्करी सराव छायाचित्रांच्या माध्यमातून..
चीनच्या लढाऊ विमानांची तैवानच्या संरक्षण क्षेत्रात घुसखोरी
न्यूज एजन्सी AFP नुसार, 3 ऑगस्ट रोजी नॅन्सी पेलोसी तैवानहून परत येताच 27 चिनी लढाऊ विमाने तैवानच्या एअर डिफेन्स झोनमध्ये दाखल झाली.
पेलोसी यांना US च्या 24 लढाऊ विमानांनी दिली होती सुरक्षा
नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून अमेरिका आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. चीन अमेरिकेला धमकावत होता. पेलोसी यांनी तैवानला भेट देऊ नये अशी चीनची इच्छा होती. दरम्यान, 2 ऑगस्टला नॅन्सी तैवानला पोहोचल्या. पेलोसी यांचे विमान तैवानच्या दिशेने गेल्यास त्यांच्यावर हल्ला करणार असल्याचे चीनने म्हटले होते. या धमकीनंतर अमेरिकन नौदल आणि हवाई दलाच्या 24 प्रगत लढाऊ विमानांनी नॅन्सी पेलोसींच्या विमानाला सुरक्षा दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.