आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनच्या धमक्यांकडे कानाडोळा करत तैवानला पोहोचलेल्या अमेरिकन खासदार नॅन्सी पेलोसी यांनी बुधवारी तैवानच्या संसदेत भाषण केले. अमेरिका तैवानच्या सोबत असल्याचे सांगून त्यांनी तैवानला सुरक्षेची हमीही दिली. पेलोसी यांनी राष्ट्रपती साई इंग वेन यांचीदेखील भेट घेऊन चर्चा केली. त्या म्हणाल्या, तैवानच्या पाठीशी खंबीरपणे राहू असे वचन अमेरिकेने ४३ वर्षांपूर्वी दिले आहे. त्या भूमिकेवर अमेरिका अजूनही ठाम आहे. पेलोसी बुधवारी तैवानचा दौरा आटोपून दक्षिण कोरियाच्या भेटीवर रवाना झाल्या. परंतु पेलाेसी यांच्या दौऱ्यामुळे चीन भडकला आहे. चीनने सलग दुसऱ्या दिवशी धमकी दिली. चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते शुआंग म्हणाले, पेलोसी यांच्या दौऱ्यामुळे परिणाम भोगावे लागतील. त्यास केवळ तैवान, अमेरिका आणि फुटीरवादी जबाबदारी असतील. चीन आपल्या शब्दावर ठाम आहे. ते सत्यात उतरतील.पेलोसी यांच्या दौऱ्यामुळे संतापलेल्या चीनच्या पीएलए सैन्याने मंगळवारी रात्रीपासूनच क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरू केला. तैवानच्या दक्षिणेकडील भागात २१ लढाऊ विमानांचे उड्डाणही झाले. आता तैवानच्या चारही बाजूंनी सहा ठिकाणी ७ ऑगस्टपर्यंत युद्धसराव केला जाईल. पेलोसी यांच्या दौऱ्याआधी त्यांचे विमान हवेतच उडवून दिले जाईल अशी धमकी दिली होती
अमेरिका, ब्रिटन तैवानसोबत, रशिया चीनच्या बाजूने
{तैवान मुद्द्यावर अनेक देश स्पष्टपणे भूमिका मांडताना दिसत नाहीत. परंतु काही देशांनी चीन तर काहींनी अमेरिकेला पाठिंबा दिला आहे. उत्तर कोरिया व रशिया चीनच्या बाजूने आहेत.
{ब्रिटन : तैवानला ब्रिटननेदेखील पाठिंबा दिला. ऑस्ट्रेलिया : याप्रकरणी तटस्थ. जपान : या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
चीनचा डाव: सायबर हल्ले, फुटीरवादाला चीनची चिथावणी
{तैवानच्या भागात चीनचा युद्धसराव
चीनचे नौदल व हवाई दलाने तैवान सीमेच्या जवळ बुधवारी पहाटेपासूनच संयुक्त युद्ध सरावास सुरुवात केली. त्यात क्षेपणास्त्रांचेही परीक्षण केल्याचा दावा आहे.
{वाळू, मासे, तंत्रज्ञान : तैवानच्या १०० पेक्षा जास्त आयातींवर निर्बंध लागू. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने तैवानच्या नैसर्गिक वाळू निर्यातीवर बंदी घातली. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मासे, फळ आयातीवर बहिष्कार टाकला. स्पीडटेक एनर्जी व हायवेब तंत्रज्ञानासह तैवानच्या कंपन्यांवर बंदी घातली.
{फुटीरवाद्यांचे गुन्हेगारीकरण : तैवानच्या फुटीरवाद्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी दंड लावण्याचा संकल्प. त्याची अंमलबजावणी कशी केली जाणारे हे स्पष्ट नाही.
{सायबर हल्ले : तैवानला मंगळवारी रात्री सायबर हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. राष्ट्रपती कार्यालयाच्या म्हणण्यानुसार सायंकाळी २० मिनिटे अडचण जाणवली. त्याची गुणवत्ता २०० पटीने खराब होती.
बेटाला ताब्यात घेणे शक्य : तैवानचे अनेक छोटे बेट आहेत. चीन त्यापैकी एखाद्या बेटावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु ती शक्यता कमी वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.