आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीजिंग:ब्रह्मपुत्रावर पूल बांधणार चीन; ईशान्येत दुष्काळाची शक्यता, अरुणाचलच्या सीमेलगत बांधणार सर्वात माेठे धरण

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बांगलादेशावरही परिणाम हाेणार, नदीवर आधीपासून सुरू आहेत 11 जलविद्युत प्रकल्प

दक्षिण आशिया विशेषकरून भारताला लागून असलेल्या सीमेवर चीन सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. आता लवकरच तिबेटमधून जाणाऱ्या ब्रह्मपूत्रा नदी किंवा यारलुंग जांगबाे (ब्रह्मपुत्राचे तिबेटी नाव) नदीच्या खालच्या प्रवाहावर भारतीय सीमेनजीक एक विशाल धरण बांधण्याची घाेषणा चीनने केली आहे. चीनने बांधलेल्या जगातील सर्वात माेठ्या थ्री जाॅर्ज धरणाच्या तुलनेत तीनपट जास्त जलविद्युत निर्मिती केली जाऊ शकेल यावरून हे धरण किती माेठे असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकताे. या मोठ्या आकाराच्या धरणामुळे भारताच्या ईशान्येकडील राज्ये आणि बांग्लादेशात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकेल. हे धरण तिबेटच्या मेडाेग काउंटीमध्ये बांधले जाऊ शकते जे भारताच्या अरुणाचल प्रदेश सीमेपासून अगदी जवळ असल्याचे संकेत चीनच्या ग्लाेबल टाइम्सने दिले आहेत.

चीनने या आधी ब्रह्मपुत्रा नदीवर अनेक लहान-माेठी धरणे बांधलेली आहेत. गेल्या एका दशकापासून चीन ब्रह्मपुत्रा नदीवर कमीत कमी ११ जलविद्युत याेजना राबवत आहे. तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातून उगम पावणारी ब्रह्मपुत्र नदी भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातून देशाच्या सीमेमध्ये प्रवेश करत अरुणाचल प्रदेशात या नदीला सियांग म्हणतात. त्यानंतरही नदी आसाममध्ये पोहोचते जिथे त्याला ब्रह्मपुत्रा म्हणतात. ब्रह्मपुत्रा आसाममार्गे बांग्लादेशात प्रवेश करते. ब्रह्मपुत्रा हा भारताच्या ईशान्य राज्ये आणि बांगलादेशातील जीवनाचा आधार मानला जातो आणि लाखो लोक उपजीविकेसाठी यावर अवलंबून आहेत. परंतु पुढच्या वर्षी नॅशनल पीपल्स काँग्रेसकडून आैपचारिक मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचा विस्तृत तपशील कळण्याची शक्यता आहे. ब्रह्मपुत्र नदी भारत आणि बांग्लादेशातून जाते. या धरणाच्या प्रस्तावामुळे दाेन्ही देशांच्या चिंता वाढल्या आहेत. दुसरीकडे आपण दाेन्ही देशांचे हित विचारात घेऊ असे चीनने म्हटले आहे.

पंचवार्षिक योजनेसाठी चीनने प्रस्ताव दिला
चीन या वर्षापासून धरणाचे बांधकाम सुरू करणार आहे. पुढील वर्षीपासून अंमलजबावणी हाेत असलेल्या १४ व्या पंचवार्षिक याेजनेमध्ये याबाबतचा प्रस्ताव आधीच मंजूर करण्यात आला आहे. ग्लाेबल टाइम्सच्या नुसार पाॅवर कन्स्ट्रक्शन काॅर्पाेरेशन आॅफ चायनाचे अध्यक्ष यांग जियाँग यांनी यारलुंग जांगबाे नदीच्या खालच्या भागात हा प्रकल्प सुरू करण्यात येईल असे म्हटले आहे. ग्लोबल टाइम्सने ‘कम्युनिस्ट यूथ लीग ऑफ चायना’च्या केंद्रीय समितीच्या एका लेखाचा हवाला देताना म्हटले आहे की यांग यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने देशाची १४ वी पंचवार्षिक याेजना (२०२१-२५) तयार करण्याच्या प्रस्तावात प्रकल्पाचा समावेश करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser