आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिघडणारी जागतिक स्थिती व वाढत्या तणावात दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यू सुक होल राष्ट्रीय सुरक्षेवरून दबावाखाली आले आहेत. त्यातच आशिया-प्रशांत क्षेत्रातील चीनची वाढती महत्त्वाकांक्षा कमी करण्यासाठी स्थापन सुरक्षा मंच क्वाडमध्ये सहभागी होण्याची होल यांची इच्छा आहे. उत्तर कोरियाकडून असलेला कायमचा धाेका लक्षात घेता दक्षिण कोरिया इतर शक्तीसाेबत असलेले संबंध अधिक दृढ करू शकतो, असे तज्ज्ञांना वाटते. परंतु काही जाणकारांचे मत वेगळे आहे. आपल्या व्यापार भागीदारासाेबत दक्षिण कोरिया थेटपणे शत्रुत्व करण्याची जाेखीम घेणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्राकडे आता तारेवरची कसरत करण्याचे काम राहिले आहे. त्यांच्याकडे इतर पर्याय देखील नाहीत, असा दावा विश्लेषकांनी केला आहे.
एप्रिलमध्ये अतिशय कडव्या संघर्षात होल यांनी सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला होता. ते म्हणाले, दक्षिण कोरियाला निमंत्रण दिल्यास आमचे प्रशासन क्वाडमध्ये सहभागी होण्यासाठी सकारात्मक विचार करू. ‘द वाॅल स्ट्रीट’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, विद्यमान सदस्य राष्ट्रांकडून निमंत्रण लवकर मिळणार नाही, असे दिसते. परंतु सेऊल या संघटनेच्या कार्य समूहातील आपल्या भागीदारीत वाढ करेल.
शपथविधीच्या आधी ३ मे रोजी योल यांनी ऑस्ट्रेलियाच्या राजदूत कॅथरिन रॅपर यांची भेट घेतली होती. क्वाडच्या कामांमध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियच्या पाठिंब्याची मागणीही त्यांनी केली होती. पूर्ण सदस्यत्वासाठी हळूहळू पाठिंबा वाढवणे असा कोरियाचा उद्देश असल्याचे होल यांनी स्पष्ट केले. या भेटीच्या तीन दिवसांनंतर भारताचे राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांची भेट घेतली होती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उत्तर कोरियाच्या चिथावणीखाेर कारवायांच्या विरोधात आवाज उठवण्याची मागणी करण्यात आली आहे. साेबतच क्वाडचे सदस्य होण्यासाठी देखील पाठिंब्याचे आवाहन केले आहे. उत्तर कोरियाने यंदा एक डझनाहून जास्त क्षेपणास्त्राचे परीक्षण केल्याचे सांगितले जाते. त्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. त्यातही होल यांच्या शपथविधीच्या तासभर आधी एका क्षेपणास्त्राचे शनिवारी परीक्षण झाले होते. त्यामुळे तणाव वाढला होता. उत्तर कोरियाने पहिल्यांदाच पाणबुडीच्या साह्याने क्षेपणास्त्राचे प्रदर्शन केले होते. दक्षिण कोरियाचे नवे नेतृत्व २१ मे रोजी सेऊलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांचे स्वागत करतील. ते २४ मे रोजी टाेकिहोमध्ये होऊ घातलेल्या क्वाडमधील बैठकीत पर्यवेक्षक म्हणून सहभागी होण्याची परवानगी मागण्याची शक्यता आहे. जपानचे फुमिहो किशिदा यांचे सरकार दक्षिण कोरियातील मागील सरकारसाेबतचे मतभेद विसरून काम करू इच्छिते.
4 देश क्वाडमध्ये समाविष्ट, भारत, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा समावेश ऑस्ट्रेलिया 2007 मध्ये पहिली क्वाड बैठक, आशिया-प्रशांत सहकार्य, माहितीची देवाण-घेवाण, लष्करी सराव
अमेरिकेशी जुने संबंध
दक्षिण कोरियाचा चीनवरील विश्वास कमी होतोय
दक्षिण कोरियातील नवे सरकार क्वाडसारख्या सुरक्षाविषयक संघटनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीरपणे सांगू लागले आहे. उत्तर कोरियासाेबतचे संबंध हाताळण्यासाठी चीनला महत्त्वाचा खेळाडू म्हणून दक्षिण कोरिया पाहत आले आहे. परंतु आता चीनच्या मदतीबाबतचा दक्षिण कोरियाचा विश्वास कमी होत चालला आहे. त्याशिवाय आता अमेरिकेसाेबतची आघाडी म्हणजे कोरियन सुरक्षेचे केंद्र होत चालले आहे. ही बाब राजकीय व आर्थिक भागीदारी म्हणून उदयाला आली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे संबंध सुरक्षेच्या पलीकडे जातात. बहुतांश कोरियन नेते व जनमत चाचणी याद्वारे आघाडीला बळकटी देण्यासाठी सहमती व्हावी, असा कल देणारी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.