आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियानंतर आता चीनने वाढवलं जगाचं टेन्शन:चीनचे लष्करी विमान तैवानच्या हवाई हद्दीत पुन्हा घुसले, प्रत्युत्तरात तैवानकडूनही क्षेपणास्त्रे तैनात

ताइपे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धामुळे त्रस्त असलेल्या जगासाठी आता तैवानमधून चिंताजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 मार्च रोजी चीनच्या लष्करी विमानाने तैवानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आणि त्यांच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घुसखोरी केली. प्रत्युत्तरादाखल तैवानने प्रथम रेडिओ इशारा जारी केला आणि नंतर त्यांची हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे तैनात केली. एका महिन्यात चीनची तैवानमध्ये ही 12वी घुसखोरी आहे.

तैवानच्या प्रसारमाध्यमांनी राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, बुधवारी एक चिनी लढाऊ विमान J-16 तैवानच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (ADIZ) च्या दक्षिण-पश्चिम भागात घुसले. या महिन्यात आतापर्यंत, तैवानच्या क्षेत्रात 38 चिनी लष्करी विमानांचा मागोवा घेण्यात आला आहे, ज्यात 26 लढाऊ विमाने, 9 स्पॉटर विमाने आणि तीन हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.

एअर डिफेन्स झोन म्हणजे काय?

एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन हे देशाद्वारे नियंत्रित केलेले क्षेत्र आहे जे त्याच्या हवाई क्षेत्राच्या पलीकडे विस्तारते. या झोनमध्ये येणाऱ्या विमानांना त्यांची ओळख हवाई वाहतूक नियंत्रकांसोबत शेअर करणे गरजेचे आहे. दोन्ही देशांची लष्करी ताकद ग्राफिक्सवरून समजून घ्या...

तैवानवर कब्जाविषयी बोलले आहेत जिनपिंग

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की, तैवानसोबत पुन्हा एकत्र येण्याचे देशाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. तेव्हापासून, तैवानला धमकावण्यासाठी चीन अनेकदा त्यांच्या सीमेत आपली लढाऊ विमाने पाठवत आहे.

यामुळे चीन करतो घुसखोरी

चिनी विमाने विशेषत: तैवानच्या नैऋत्येकडील हवाई हद्दीत घुसखोरी करतात. 1949 मध्ये गृहयुद्धात तैवान आणि चीन वेगळे झाले, परंतु चीन या बेटावर दावा करत आहे. परिणामी, बीजिंग तैवान सरकारच्या प्रत्येक कृतीला विरोध करते. ते तैवानला एकटे पाडण्यासाठी आणि धमकावण्यासाठी मुत्सद्दी आणि लष्करी बळाचा वापर करत आहेत.

2016 मध्ये तैवानच्या नागरिकांनी त्साई इंग वेन यांची अध्यक्षपदी निवड केल्यानंतर तणाव वाढला आहे. त्साईची मते चीनच्या बाजूने होती आणि दोन्ही एकाच चिनी राष्ट्राचा भाग असल्याच्या दाव्याचे समर्थन केले. नंतर त्याचे विचार बदलले. यामुळे चीन नाराज झाला. बीजिंगने तैवान सरकारशी सर्व संपर्क तोडला होता.

बातम्या आणखी आहेत...