आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन तणाव:चीन युद्ध करून शेजारी देशांनाचिथावतोय : अमेरिकन तज्ज्ञ, आशिया सोसायटी पॉलिसी इन्स्टिट्यूटचे मत

वॉशिंग्टन10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परिस्थितीवर नजर : अमेरिकी परराष्ट्र मंत्रालय

भारतासोबत सीमावाद काढून चीन शेजारील देशांना चिथावण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक चीनने आपल्या अर्थव्यवस्थेला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे जगाला वाटत असताना ही कुरापत सुरू आहे, अशा कडक शब्दांत अमेरिकेतील एशिया साेसायटी पॉलिसी इन्स्टिट्यूटने भारत-चीन सीमावादावर प्रतिक्रिया दिली आहे.

इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष डॅनियल रसेल म्हणाले, चीन शेजारी देशांना उचकावण्याचे काम करत आहे. जगाला चीनकडून वेगळ्या अपेक्षा अाहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष देण्यास प्राधान्य असायला हवे. इतर देशांसोबतचा संघर्ष टाळला पाहिजे. चीनच्या हालचाली पाहता राष्ट्रपती शी जिनपिंग यांची चिनी राष्ट्रवादाबाबतची ही जाणूनबुजून आखलेली नीती असू शकते, असे रसेल यांनी सांगितले. रसेल पूर्व आशिया व प्रशांत क्षेत्रासंबंधी व्यवहारमंत्रीदेखील होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीन यांच्यातील हालचालींवर जवळून नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याने २० सैनिक शहिद झाल्याचा दावा केला आहे. आम्ही सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. या समस्येवर शांततामय मार्गाने तोडगा निघावा, असे अमेरिकेला वाटत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात २ जून २०२० फोनवरून चर्चा झाली होती. त्यात भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबतही चर्चा झाली होती.

नेपाळ चिंतेत
संघर्षाचा परिणाम आशियावर होईल : माजी उपपंतप्रधान

माजी उपपंतप्रधान सुजाता कोईराला म्हणाले, भारत-चीन यांच्यातील संघर्षाचा परिणाम संपूर्ण आशियावर दीर्घकाळ राहू शकतो. आमचे भारत व चीनसोबत चांगले संबंध आहेत.
हे संबंध बळकट व्हावेत असे आम्हाला वाटते. नेपाळचे माजी परराष्ट्रमंत्री भेख बहादूर थापा म्हणाले, हिंसक धुमश्चक्री व्हायला नको.
लडाखमध्ये भारत-चीन वाद हा गत युद्धातून जन्मलेली समस्या आहे. या मुद्द्यावर चर्चेतून तोडगा काढला पाहिजे. लिंपियाधुरा-लिपुलेखमध्ये भारत-नेपाळ सीमावादालादेखील सातत्यपूर्ण राजकीय चर्चेतून सोडवले जाऊ शकते.

युरोपीय संघ म्हणाले
चीनसाठी मजबूत रणनीतीची गरज; अमेरिकेची साथ

ब्रुसेल्स । युराेपीय संघाने (ईयू) सध्याच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ईयूचे परराष्ट्र प्रकरणाचे प्रतिनिधी जोसेफ बोरेल म्हणाले, चीनसाठी मजबूत रणनीती बनवण्याची गरज आहे. त्यासाठी युरोपीय संघ व अमेरिकेने एकत्र येण्याची गरज आहे. बोरेल मीडियाशी बोलत होते. चीनला केंद्रस्थानी ठेवून द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याचा सल्ला आम्ही अमेरिकेला दिला आहे. लोकशाहीवादी आशियाई देशांच्या चांगल्या संबंधासाठी हे गरजेचे आहे. ईयूच्या वक्तव्यावर अमेरिकेने प्रतिक्रिया दिलेली नाही. जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हेइको मास यांनी ईयूच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
छायाचित्र दिल्लीतील चिनी राजदूत कार्यालयसमोरील आहे. येथे माजी सैनिकांनी चीनच्या विरोधात निदर्शने केली. तेव्हा सुरक्षा दलाने त्यांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...