आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China Wuhan Coronavirus Cases Latest Updates | Recovered Covid 19 Patients In Wuhan Suffering From Lung Harm

वुहानमधून धक्कादायक खुलासा:कोरोनातून ठीक होणाऱ्या 100 पैकी 90 रुग्णांची फुफ्फुसे खराब झाली, 10 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या नाही

वुहानएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना व्हायरस ज्या शहरातून सुरू झाला, त्या वुहानमधून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. येथील कोरोनातून बरे झालेल्या 100 पैकी 90 रुग्णांच्या फुफ्फुसांना नुकसान पोहचल्याचे समोर आले आहे. सरकारी चीनी मीडिया ग्लोबल टाइम्सनुसार, वुहानमधील एका मोठ्या हॉस्पीटलमधील एका रुग्णांच्या समुहाचे परीक्षण करण्यात आले होते.

परीक्षणाअंती 90 रुग्णांचे फुफ्फुस खराब झाल्याचे समोर आले. या रुग्णांच्या फुफ्फुसातून ऑक्सीजनचा पुरवठा सामान्य व्यक्तीप्रमाणे होत नसल्याचे दिसले. तसेच, 5 टक्के लोकांमध्ये परत संक्रमण झाल्याचे दिसल्यानंतर त्यांना क्वारेंटाइन करण्यात आले.

अशा रुग्णांचे सरासरी वय 59 वर्षे

वुहानमध्ये रिकव्हर झालेल्या रुग्णांची स्थिती जाणून घेण्यासाठी सतत चेकअप केले जात आहेत. जुलैमध्ये या अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. याच क्रमाणे वुहान यूनिव्हर्सिटीच्या झोंगनन हॉस्पीटलमधील आयसीयू यूनिटचे डायरेक्टर पेंग झियोंगने आपल्या टीमसोबत मिळून अशा रुग्णांचे परीक्षण केले आहे. परीक्षणात धक्कादायक बाबी समोर आल्या. एक वर्ष चालणाऱ्या या अभियानाचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण झाला. या अभियानात सरासरी 59 वर्षांचे रुग्ण सामील झाले होते.

6 मिनीटात 400 पाऊले चालू शकले रुग्ण

पेंग आणि त्यांच्या टीमने रिकव्हर झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसाचे परीक्षण करण्यासाठी त्यांना सहा मिनीटा चालण्यास सांगितले. यादरम्यान समोर आले की, 6 मिनीटात हे रुग्ण फक्त 400 मीटर चालू शकले. याउलट निरोगी व्यक्ती सहा मिनीटात 500 मीटर दूर चालू शकतो.

10 टक्के रुग्णात तयार झाल्या नाही अंटीबॉडी

बीजिंग यूनिव्हर्सिटी ऑफ चायनीज मेडिसिनच्या डोंगझेमिन हॉस्पीटलचे डॉ. लियांग टेंगशियाओ चे म्हणने आहे की, ठीक झालेल्या काही रुग्णांना पुढील तीन महिन्यांसाठी ऑक्सीजन मशीनची गरज भासत आहे. लियांग आणि त्यांची टीम 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांची माहिती गोळा करत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या परिणांममध्ये कळाले की, 100 पैकी 10 रुग्णांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या नाहीत.

बातम्या आणखी आहेत...