आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन कोरोना:वुहानममध्ये 1290 जणांचा मृत्यू, आधी 2579 मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते, आताच्या आकडेवारीनुसार 3869 जणांचा बळी

वुहानएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनच्या वुहानमधूनच जगभर कोरोना पसरला, चीनमध्ये मृतांचा आकडा वाढून 4 हजार 632 वर

चीनमधील ज्या वुहान शहरातून जगभर कोरोना व्हायरस पसरला होता, त्याच शहरातून मृतांची नवीन आकडेवारी समोर आली आहे. आधी सांगण्यात आले होते की, वुहानमध्ये कोरोनामुळे 2 हजार 579 जणांचा मृत्यू झाला आहे. आता नवीन आकडेवारीनुसार वुहानमध्ये अजून 1 हजार 290 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

चीनच्या नॅशनल हेल्थ कमीशनने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. या रिपोर्टनुसार फक्त वुहान शहरात एकूण 3 हजार 869 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे आधीपेक्षा 50% जास्त. म्हणजेच, आता चीनमध्येही मृतांचा आकडा वाढत आहे. नवीन रिपोर्टनुसार चीनमध्ये एकूण 4 हजार 632 जणांचा मृत्यू झाला आहे. पहिली आकडेवारी 3 हजार 342 सांगण्यात आली होती. चीनने मान्य केले की, अनेक मृत्यूंची कारणे समजण्यात चूक झाली. नवीन आकडेवारीनुसार वुहानमध्ये 325 नवीन रुग्ण सापडल्याची माहिती आहे. हा आकडा आता 50 हजार 333 झाला आहे. यासोबतच चीनमध्ये संक्रमितांचा आकडा 82 हजार 692 झाला आहे.

अमेरिकेने चीनचे आकडे खोटे असल्याचे म्हटले

संपूर्ण जगाने चीनच्या नॅशनल हेल्थ कमीशन (एनएचसी)कडून जानेवारीपासून दररोज दिल्या जाणाऱ्या मृतांच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला होता. अमेरिकाही चीनच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अनेक वेळा मृतांची आकडेवारी लपवल्याबद्दल चीनवर निशाना साधला आहे. त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनवर चीनची बाजू घेतल्याचा आरोप करत फंडीग थांबवली आहे.

बातम्या आणखी आहेत...