आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • China's Attempt To Take Over The World's Technology; The Head Of Britain's Cyber Intelligence Service; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोका:जगाचे तंत्रज्ञान ताब्यात घेण्याचा चीनचा प्रयत्न; सावधानतेचा इशारा; ब्रिटनच्या सायबर गुप्तचर सेवेचे प्रमुख फ्लेमिंग यांचा गौप्यस्फोट

लंडन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तंत्रज्ञानावर नियंत्रणासाठी पाश्चात्त्य देशांना करावी लागू शकते लढाई

ब्रिटनमधील प्रमुख सायबर गुप्तचर सेवेचे प्रमुख जेरेमी फ्लेमिंग यांनी जगाला सावधानतेचा इशारा देतानाच चीन जगातील तंत्रज्ञान अापल्या नियंत्रणाखाली अाणण्याबराेबरच जागतिक अाॅपरेटिंग सिस्टिम अापल्या वर्चस्वाखाली अाणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गाैप्यस्फाेट केला अाहे. फ्लेमिंग तंत्रज्ञानावर चीनला अधिराज्य गाजवण्यापासून राेखण्याची गरज असल्याचे म्हटले अाहे. फ्लेमिंग हे गव्हर्नमेंट कम्युनिकेशन्स हेड क्वार्टर्स (जीसीएचक्यू) या ब्रिटनच्या प्रमुख सायबर गुप्तचर सेवा संस्थेचे संचालक अाहेत.

पाश्चात्त्य देशांना भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम जीवशास्त्र आणि अनुवंशशास्त्र यासारख्या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवण्याच्या लढाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता फ्लेमिंग यांनी व्यक्त केली अाहे त्यांच्या मते तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाची वाटचाल काही काळापासून पूर्वेच्या दिशेने हाेत असून यामधील चीनची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. वस्तुतः फ्लेमिंगचा संदर्भ चिनी हॅकर्सच्या दिशेने हाेता. ज्यांच्यामार्फत यापूर्वी डेटा चोरी आणि महत्त्वाची माहिती प्राप्त करण्याची प्रकरणे गेल्या काही काळात समाेर अाली अाहेत. फ्लेमिंग म्हणाले की, अाम्ही एक-एक क्षण या समस्येचा सामना करत अाहाेत. भविष्यात ही समस्या माेठे रूप धारण करू शकते. त्या दृष्टीने अाताच पावले उचलण्याची नितांत गरज अाहे.

ब्रिटनला निर्माण होणारे संभाव्य धोके ओळखणे आणि ते रोखण्यासाठी जगभरातील माहिती जीसीएचक्यू गाेळा करते. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा संस्था तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड देशांशी या संस्थेचे जवळचे संबंध आहेत. ही युती जगात “फाइव्ह आइज’ म्हणून ओळखली जातात. फ्लेमिंग म्हणाले की, ब्रिटनला जर जागतिक सायबर पाॅवर म्हणून स्थान टिकवायचे असेल तर संवेदनशील माहिती व क्षमतांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने क्रिप्टोग्राफिक तंत्रज्ञानासह ‘साॅवरेन’ हे क्वाँटम तंत्रज्ञान विकसित करावे लागेल.

जागतिक शक्तींमध्ये हाेईल स्पर्धा; चीन आधीपासून तयार
फ्लेमिंग यांनी म्हटले आहे की येत्या काही वर्षांत सर्वोत्तम तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि भविष्याला आकार देण्यासाठी जागतिक शक्तींमध्ये स्पर्धा निर्माण हाेईल. साेबतच तल्लख बुद्धी असलेल्या लाेकांना नियुक्त करून तंत्रज्ञान नियंत्रित करणाऱ्या जागतिक मानकांवर प्रभुत्व मिळवेल. फ्लेमिंगच्या म्हणण्यानुसार, चीनने अनेक वर्षांपासून त्यावर काम सुरू करून आधीच तयारी केली आहे. इतर पाश्चात्त्य देशांनीही यावर आता विचार करण्याची गरज आहे.

रशियाचाही पश्चिमेला धोका
येणाऱ्या काळात चीनसह रशियाकडून पश्चिमसाठी तात्कालिक त्वरित धोका हाेण्याची शक्यता फ्लेमिंग यांनी व्यक्त केली. ते म्हणतात की कम्युनिस्ट चीनचे दीर्घकालीन वर्चस्व ही खूप मोठी समस्या आहे.
जेरेमी फ्लेमिंग

बातम्या आणखी आहेत...