आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिपोर्ट:एलएसीवर चीनचा हवामान बदलण्याचादेखील कट, वेदर मॉडिफिकेशन प्रोग्राम केला सुरू

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
चीनशी तणावादरम्यान ‘सवर्म ड्रोन’चे परीक्षण - Divya Marathi
चीनशी तणावादरम्यान ‘सवर्म ड्रोन’चे परीक्षण
  • भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 1.5 पट भागात हवामानात बदल होण्याची शक्यता

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेल्या आठ महिन्यांपासून दबा धरून बसलेल्या चीनने आता भारताविरुद्ध एक मोठे षड‌्यंत्र रचले आहे. चीनने या आठवड्यात हवामान संबंधित कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम सध्या प्रायोगिक स्तरावर आहे. या माध्यमातून चीन ५५ दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापण्याची योजना आखत आहे. हा भाग भारताच्या एकूण क्षेत्रापेक्षा १.५ पट जास्त आहे. चीन या माध्यमातून कट रचत सीमेच्या पलीकडे असलेल्या भागावर ताबा मिळवू शकतो, अशी भीती तज्ज्ञांना वाटत आहे.

सीएनएनच्या एका अहवालानुसार, चीन यंदा वेदर मॉडिफिकेशन प्रोग्रामला वेगाने वाढवण्याचा विचार करत आहे. चीन ५५ लाख वर्ग किमी क्षेत्र कव्हर करण्याची योजना आखत आहे. राज्य परिषदेने दिलेल्या निवेदनानुसार, चीन २०२५पर्यंत विकसित केलेली हवामान सुधार प्रणाली विकसित करेल. सरकारी एजन्सीने दिलेल्या निवेदनानुसार, चीन येणाऱ्या पाच वर्षात कृत्रिम पाऊस पाडुन किंवा बर्फवृष्टी करुन ५५ लाख किमीपर्यंतचे क्षेत्र व्यापण्याचा विचार करत आहे. अहवालानुसार, या तंत्राचा वापर करत ५ लाख ८० हजार किमीचा भाग गारांपासून वाचण्यावरही विचार केला जात आहे. याबरोबरच चीन काही आवश्यक आयोजनांचीदेखील तयारी करत आहे. यापूर्वी चीनने २००८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या आधी धुके कमी करण्यासाठी आणि पाऊस टाळण्यासाठी कृत्रिम ढग तयार केले हाेते. चीन गेल्या काही दशकांपासून या तंत्रावर काम करत आहे. अनेक अडचणींनंतरही चीन यावर मोठी गुंतवणूक करत आहे. गेल्या वर्षी या तंत्रामुळे चीनने देशाच्या पश्चिम शिनजियांग भागात गारपिटीमुळे होणारे नुकसान ७० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.

चीनशी तणावादरम्यान ‘सवर्म ड्रोन’चे परीक्षण
टोळीसारख्या शत्रूवर तुटून पडणाऱ्या स्वदेशी ‘सवर्म-ड्रोन्स’ तंत्रज्ञानामध्ये भारताने मोठे पाऊल उचलले आहे. एलएसीने चीनबरोबर संघर्ष सुरूच ठेवला त्या वेळी भारताने ड्रोनच्या झुंडी तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. चीन एआय-साहाय्यित ड्रोनमध्ये माहिर आहे. शनिवारी भारतीय हवाई दलाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या चाचणीचे फोटो शेअर केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser