• Home
  • International
  • China's defense budget remains strong despite Corona crisis; Increased by 6.6 percent

नवी चाल / कोरोनाच्या संकटातही चीनचे संरक्षण बजेट भक्कम; 6.6 टक्के वाढवले

  • नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक बैठकीत घोषणा, 30 वर्षांनंतर जीडीपीकडे दुर्लक्ष

वृत्तसंस्था

May 23,2020 09:35:00 AM IST

बीजिंग. जग कोरोना संकटामुळे आर्थिक मंदीचा सामना करू लागले आहे. त्यामुळे जगभरातील देश संरक्षणावरील खर्चात कपात करू लागले आहेत. असे असूनही चीनने २०२० या वर्षासाठी संरक्षण बजेटमध्ये ६.६ टक्क्यांनी वाढ करत असल्याचे जाहीर करून टाकले. कोरोना संकट पाहता अर्थव्यवस्थाही त्यातून वाटचाल करत आहे. परंतु आताची संरक्षण खर्च गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे चीन सरकारने म्हटले आहे. अमेरिकेनंतर चीन संरक्षणावर सर्वाधिक खर्च करत आहे. कोरोना संकट असूनही चीन यंदा १३.६८ लाख कोटी रुपये संरक्षणावर खर्च करणार आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक बैठकीत त्याची घोषणा करण्यात आली आहे. जगातील तिसरी पायदळ सैन्य बाळगणाऱ्या चीनने विमानवाहू जहाज, अणुऊर्जेवरील पाणबुडी व लढाऊ जेटसाठी खजिन्याचे दार उघडले. वार्षिक अधिवेशनात पंतप्रधान ली केचियांग म्हणाले, महामारीमुळे देश अनिश्चिततेच्या परिस्थितीत अडकला आहे आणि अर्थव्यवस्थेला वाईट परिस्थितीशी तोंड द्यावे लागत आहे. आगामी काळात आर्थिक विकासदराची उद्दिष्टे निश्चित न करण्याची चीनची ही पहिलीच वेळ आहे.

धमकी : कारवाई करून तैवानवर ताबा मिळवू

चीन तैवानबाबत नरमाईचे धोरण स्वीकारण्यास मुळीच तयार नाही. तैवान स्वत:हून चीनमध्ये सामील न झाल्यास त्याच्यावर लष्करी कारवाई करून ते ताब्यात घेतले जाईल, असा चीनने पवित्रा घेतला आहे. संसदेतील भाषणात चीनचे पंतप्रधान ली केकियांग म्हणाले, आम्ही त्यास विरोध करू. तैवानच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात येणाऱ्या कोणत्याही कारवाईला आमचा कडाडून विरोध असेल.
चीनसमोर नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे संकट

अर्थव्यवस्था पार कोलडमडल्यासारखी परिस्थिती असूनही चीनने संरक्षण बजेटमधील तरतूद वाढवली आहे. चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. परंतु सध्या चीनसमोर नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे संकट आहे. अर्थव्यवस्थेवरील संकटानंतरही चीनचे नेते सैन्य बळकटीला जास्त महत्त्व देणे महत्त्वाचे मानतात. वृद्धी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनसुबे : दक्षिण चीन सागर क्षेत्रावरील पकड मजबूत

परदेश संरक्षण तज्ञांच्या मते, चीनचे वास्तविक संरक्षण बजेट खूप जास्त आहे. बजेटमध्ये अनेक गोष्टींना समाविष्ट केले जात नाही. गेल्या वर्षी चीनने ७.५ वृद्धी ठेवली होती. गेल्या वर्षी चीनचे वास्तविक बजेट २२० अब्ज डॉलर होते. चीन यंदा संरक्षण बजेटचा पैसा आपल्या नौदलावर करणार आहे. दक्षिण चीन सागर क्षेत्रावरील पकड मजबूत ठेवण्याचेही चीनचे यातून मनसुबे दिसतात.

७० नोबेल विजेत्यांनी संशोधन अनुदान बंद केल्यावरून केली टीका

जेम्स गॉर्मन

वटवाघळापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शोधासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाला रद्द केल्यावरून ७० नोबेल विजेता संशोधकांनी चीनवर टीका केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात चौकशी करण्याची अमेरिकेकडे मागणीही केली. इको हेल्थ अलायन्स समूहाला सुमारे २३ कोटी रुपयांचे हे अनुदान दिले जात हाेते. हे संशोधन महामारी रोखण्याशी संबंधित आहे. हा समूह जगभरात पशूंमधून माणसामध्ये होणाऱ्या प्रादुर्भावाचा अभ्यास करतो. त्याचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. हा समूह वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीसोबत मिळून संशोधन करत आहे. वुहानला कोरोना प्रादुर्भावाचे केंद्र मानले जाते. तूर्त तरी संशोधक कोरोना पशूंमधून नव्हे, तर निसर्गात तयार झाल्याच्या निष्कर्षावर आले आहेत. इको हेल्थ अलायन्सचे प्रमुख पीटर दास्जक यांनी अनुदान बंद करण्यात आल्याची माहिती दिली. वास्तविक चीनच्या राष्ट्रीय संस्थेने हे अनुदान आणि प्रकल्पाला आपल्या प्राधान्यक्रमात ठेवले होते. तरीही असा निर्णय घेण्यात आल्याने नाराजी आहे.

X