आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China's First Vaccine On Corona, AD5 ENCOV, Received A Patent; Testing Begins In Many Countries, Expected By The End Of The Year

कोरोना व्हॅक्सीन:कोराेनावरची चीनची पहिली लस एडी 5-एनकोव्हला मिळाले पेटंट; अनेक देशांत चाचणी सुरू, वर्षअखेरपर्यंत येण्याची अपेक्षा

बीजिंगएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

चीनने कोरोनाची पहिली लस एडी ५- एनकोव्हच्या पेटंटला मंजुरी दिली आहे. ही लस चीन लष्कराचे मेजर जनरल चेन वेई व कॅन्सिनो बायोलॉजिक्स आयएनसी कंपनीच्या सहकार्याने तयार झाली आहे.

चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सनुसार, पेटंटसाठी १८ मार्चला विनंती करण्यात आली होती आणि ११ ऑगस्टला मंजुरी दिली. चीनच्या तज्ञांनुसार, चीन सुरक्षित व प्रभावी पद्धतीने वेगात कोरोना लसनिर्मितीकडे पावले टाकत आहे. लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अनेक देशांत सुरू असून वर्षअखेरपर्यंत ती बाजारात येण्याची आशा आहे. कॅन्सिनोने शेवटच्या टप्प्यातील चाचणीसाठी मेक्सिकोसोबत करार केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कॅन्सिनाेने रशिया, ब्राझील आणि चिलीसोबत चर्चा सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...