आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे परदेशात बेकायदा ठाणे:सरकारविरोधात बोलणाऱ्यांची धरपकड करून मायदेशी रवानगी, आतापर्यंत 2.30 जणांवर कारवाई

अमेरिका / रोहित शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशात वास्तव्याला असलेल्या आपल्या नागरिकांवर चीन सरकारची केवळ निगराणीच नव्हे तर त्यांची धरपकड करून त्यांना मायदेशी पाठवण्यात येत आहे. त्यासाठी चीनने अमेरिका-ब्रिटनसह अनेक देशांत बेकायदा पोलिस ठाणी सुरू केली आहेत.

स्पेनच्या एनजीओ सेफगार्ड डिफेंडरच्या अहवालानुसार चीनने २१ देशांतील २५ शहरांमध्ये ५४ ठाणी सुरू केली आहेत. अमेरिकन तपास संस्था एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर म्हणाले, चिनी पोलिस ठाण्यांबद्दलची माहिती मिळाली आहे. तपास सुरू झालाय. सेवा केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या या ठाण्यांचे लक्ष्य आपल्या नागरिकांवर नियंत्रण ठेवणे असा आहे. चीनविरोधी बोलणाऱ्या लोकांवर चीनमध्ये खटले चालतात. जिनपिंग विरोधकांना याद्वारे लक्ष्य करू लागले आहेत.

२.३० लाख चिनी नागरिकांना परत येण्यासाठी भाग पडले
एप्रिल २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान चीनने या केंद्राद्वारे २.३० लाख चिनी नागरिकांना मायदेशी येण्यास भाग पाडले. अनेक नागरिकांवर ऑनलाइन फसवणुकीचे आरोप करण्यात आले. अशा लोकांच्या चीनमधील नातेवाइकांना धमकावणे, ब्लॅकमेल करण्यात आले. अनेक खटल्यांमुळे या नागरिकांना वैतागून मायदेशी यावे लागले.

बातम्या आणखी आहेत...