आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगन इफेक्ट:सौदी-इराणचा करार करून चीनचा संदेश; अमेरिका करू शकत नाही ते आम्ही करताेय

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराण आणि सौदी अरेबियाने शुक्रवारी ७ वर्षांनंतर मुत्सद्देगिरीचे संबंध बहाल करण्यावर संमती दर्शवली. दोन्ही देशांतील शत्रूत्वामुळे आखातात स्थैर्य आणि सुरक्षेसाठी धोका निर्माण केला होता. मध्यपूर्वेतील दोन स्पर्धक शक्तींच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांत बीजिंगमध्ये चार दिवसांपूर्वी एका अज्ञात वाटाघाटीनंतर या कराराची घोषणा करण्यात आली. तिघांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, तेहरान आणि रियाध यांच्यातील मुत्सद्देगिरीचे संबंध पुन्हा सुरू करणे तसेच दोन महिन्यांच्या आत आपले दुतावास आणि मिशन पुन्हा सुरू करण्यावर संमती झाली.

करारांतर्गत देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर आणि अंतर्गत प्रकरणांत हस्तक्षेप न करण्याचा समावेश आहे. हा घटनाक्रम जागतिक मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. मात्र, त्यात क्रांतिकारक बदल झाल्याचे मानणे चुकीचे ठरेल. चीने या कराराला अंतिम रूप देऊन मोठा प्रचार करत आहे. जे अमेरिकेला करता आले नाही, ते आम्ही करत आहोत.

1 भारताला स्थितीनुसार स्वत:ला तयार करावे लागेल अमेरिका मध्यपूर्वेत बाहेर पडल्यानंतर आणि त्याचे संपूर्ण लक्ष प्रशांत क्षेत्रावर असताना हा करार झाला याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारताबाबत बोलायचे झाल्यास नव्या समिकरणात स्वत: कसा समायोजित होईल हे पाहावे लागेल. मात्र, सध्या चिंतेचे कारण नाही.

2 सौदीसाठी चीन विश्वासार्ह नाही; अमेरिकेवर आजही विश्वास, इराणला पर्याय मानले चीन या घटनाक्रमाच्या केंद्रस्थानी आहे.मात्र, सौदी अरेबियाला चांगले माहीत आहे की, त्याला सुरक्षा मानकावर केवळ अमेरिकेकडूनच मदत मिळेल. त्याचाही चीनवर विश्वास नाही. दुसरीकडे, इराण आणि चीनची मैत्री वाढली आहे,यात दुमत नाही. याचे कारण म्हणजे, पाश्चिमात्त्य देशांची विरोधी भूमिका असणे होय.

3 इराक, सीरिया, येमेनमध्ये स्थिती बदलल्यावरच करार परिणामकारक मध्यपूर्वेत सीरिया, येमेन आणि इराकच्या वेगवेगळ्या भागांत बंडखोर आणि सरकारमध्ये संघर्ष चालू आहे. या संघर्षाला सौदी अरेबिया आणि इराणही मदत करत आहे. या प्रदेशांतील संघर्षाच्या क्षेत्रांत स्थिती बदलल्यास नव्या कराराचा परिणाम मानला जाईल.

4 इस्रायलसाठी मुत्सद्देगिरीचे संबंध वाढणे धोक्याचे, यात बदल झाल्यास तोच निशाण्यावर असेल मुत्सद्देगिरीच्या संबंधातून शत्रूत्व कमी झाल्यास त्याचा इस्रायलवर थेट परिणाम होईल. इस्रायलला इराण देश म्हणून मान्यता देत नाही. प्रादेशिक संघर्षाापासून दूर होण्याच्या स्थितीत देशांतर्गत पातळीवर बळकट होण्यासाठी त्याच्याकडून इस्रायलवर हल्ले तीव्र होतील. त्याने स्वत: हल्ले केले नाही तरी गाझा पट्टीत बंडखोरांना जास्त मदत पोहोचवली जाईल.

अमेरिका म्हणाली- आम्ही हटलेलो नाही, मात्र तणाव निवळण्याचे समर्थन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, इस्रायल आणि त्याच्या आखातातील शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहावेत हे सर्वांसाठी आवश्यक आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, हे चुकीचे ठरेल की, चीन मध्य पूर्वेतून अमेरिका बाहेर पडल्यानंतर त्याची जागा घेत आहे. अमेरिका मध्य पूर्वेत बाजूला जात नाही. मात्र,तणाव कमी करण्यासाठी तेथे होत असलेल्या सर्व प्रयत्नांचे समर्थन करतो.

बातम्या आणखी आहेत...