आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे ऑरेंज आयलँड:तरुणाईला आकर्षित करतेय ‘रेड टुरिझम’

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र चीनच्या हुनान राज्यातील चांगशा स्थित ऑरेंज आयलँडचे आहे. येथे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे पहिले चेअरमन माओ जेडोंग यांचे ३२ मीटर उंच स्मारक आहे. हे स्मारक ८०० टन ग्रॅनाइटपासून केले आहे. सध्या तरुणाईसाठी प्रमुख पर्यटनस्थळ झाले आहे. येथे येणाऱ्या तरुणाईत २० ते ३० वयोगटातील युवांचा समावेश आहे. चीन यास रेड टुरिझम नावाने प्रोत्साहन देत आहे. मुले आणि तरुणाईसाठी येथे संगीत व नाटकाचे आयोजन केले जाते. रात्रीच्या वेळी लाइट शोच्या माध्यमातून चिनी इतिहासाची माहिती दिली जाते. एवढेच नव्हे तर रेड स्पॉटवर येणारी मुले व तरुणांसाठी कोर्सचेही आयोजन केले आहे.

वार्षिक ६३०% वाढले पर्यटन : २००० नंतर जन्मलेल्या लोकांमध्ये रेड स्पॉट्सवर येण्याचे प्रमाण वार्षिक ६३०% वाढले आहे. २०१९ मध्ये येथे ७ कोटी व्हिजिटर आले होते. यामुळे चीन सरकारला जवळपास ५१ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला होता.