आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरबी दुर्घटनेवर चीनी राष्ट्राध्यक्षांकडून दुःख व्यक्त:जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवला शोकसंदेश

बीजिंग25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या मोरबीत झालेल्या पूल दुर्घटनेवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दुःख व्यक्त केले आहे. जिनपिंग यांनी एक शोकसंदेश पाठवून या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

राष्ट्रपतींना पाठवला शोकसंदेश

चीनची सरकारी वृत्तसंस्था सीसीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी राष्ट्रपती द्रौपती मूर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक शोकसंदेश पाठवला आहे. या शोकसंदेशात त्यांनी मोरबी दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

जिनपिंग यांचा शोकसंदेश

जिनपिंग यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, 'चीन सरकार आणि चीनी लोकांच्या वतीने मी पीडितांविषयी शोक संवेदना व्यक्त करतो'

मोरबी दुर्घटनेविषयी खालील बातम्याही वाचा...

मोरबी दुर्घटना- दुखवट्यात स्वागत:मोदींच्या दौऱ्याआधी रुग्णालयाची डागडुजी, नवे बेड-वॉटर कूलर लावले; येथेच काल होते 100 मृतदेह

गुजरातमध्ये बुधवारी एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मोरबीमध्ये मृतांच्या कुटुंबीयांची आणि जखमींची भेट घेणार आहेत. मोरबी दौऱ्यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलला रंगरंगोटी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. रुग्णांच्या वॉर्डात नवीन बेड आणि वॉटर कुलरही बसवण्यात आले आहेत. काल याच रुग्णालयात 100 मृतदेह आणण्यात आले होते.(वाचा पूर्ण बातमी)

मोरबी पूल दुर्घटना प्रकरण सर्वोच्च न्यायालयात:14 नोव्हेंबरला होणार सुनावणी, न्यायिक आयोग स्थापन करण्यासाठी तातडीने निर्देश द्याव; याचिकाकर्त्याची मागणी

गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळून 140 जणांच्या मृत्यूचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या घटनेच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात 14 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. देशभरातील जुन्या इमारतींचे सुरक्षेचे मूल्यांकन करण्याची मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. (वाचा पूर्ण बातमी)

गुजरातच्या मुख्यंमत्र्यांनी राजीनामा द्यावा:मोरबी दुर्घटनेवर अरविंद केजरीवाल यांची मागणी; म्हणाले - हे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी तत्काल आपल्या पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. मोरबी दुर्घटना भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. घडी बनवणाऱ्या कंपनीला पुलाचा ठेका का देण्यात आला? या कंपनीकडे पुलाची दुरुस्ती करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. म्हणजे त्यांचे भाजपशी संबंध आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.(वाचा पूर्ण बातमी)

मोरबीच्या गुन्हेगारांना अभय:केवळ क्लार्क, गार्ड-मजुरांना अटक.. 'ओरेवा'सह तिचे MD व अधिकाऱ्यांचे नाव FIR मध्ये नाही

गुजरातच्या मोरबीतील पुल कोसळल्याच्या अपघातील बळींचा आकडा 141 वर पोहोचला आहे. यात 50 हून अधिक मुलांचा समावेश आहे. मृत्युच्या या भयावह आकड्यामुळे अनेकांच्या काळजाचे पाणी होत असले तरी आता या घटनेतील खऱ्या गुन्हेगाराना वाचवण्याचा खेळ सुरू झाला आहे. पोलिसांनी सोमवारी या घटनेतील 9 जणांना अटक केली आहे. त्यात ओरेवाच्या 2 मॅनेजर, 2 मजूर, 3 सेक्युरिटी गार्ड व 2 तिकीट क्लर्कचा समावेश आहे.(वाचा पूर्ण बातमी)

बातम्या आणखी आहेत...