आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:चीनच्या उइगर मुस्लिमांच्या हत्याकांडाचे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय कोर्टात, आरोपींत राष्ट्रपती शी जिनपिंगही

मार्लाइस सिमाॅन्स | बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिनजियांगमध्ये मागील 3 वर्षांत 18 लाखांपेक्षा जास्त उइगर बेपत्ता
  • स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या उइगरांची नसबंदी अन् गर्भपात

चीनमधील उइगर मुस्लिमांचे हत्याकांड, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि शोषणाचे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात पोहोचले आहे. उइगर समुदायाशी संबंधित पूर्व तुर्कीस्तानचे प्रतिसरकार आणि जनजागृती चळवळ राबवणाऱ्या संघटनेने एकत्रितपणे हे प्रकरण दाखल केले आहे. पूर्व तुर्कस्तानला चीनमधील शिनजियांग प्रदेशाचे नाव दिले आहे. उइगर समाजाचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून या प्रदेशाच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत उइगरांवर झालेल्या अत्याचारात चीनची चाैकशी होऊ शकते. लंडन येथील वकिलांच्या एका गटाने उइगर समुदायावरील अत्याचार आणि कंबोडिया व ताजिकिस्तानात हद्दपार केल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारमधील ८० जणांवर उइगरांच्या हत्याकांडाचा आरोप आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सत्तेत आल्यानंतर उइगर मुस्लिमांनी आपला धर्म सोडावा, चीनची हुकुमशाही स्वीकारावी म्हणून दबाव आणला. उइगरांची जबरदस्तीने नसबंदी आणि गर्भपात केले.

शिनजियांगमध्ये मागील ३ वर्षांत १८ लाखांपेक्षा जास्त उइगर बेपत्ता

शिनजियांगमध्ये मागील ३ वर्षात १८ लाखांपेक्षा अधिक उइगर व इतर अल्पसंख्याकांना एक तर तुरुंगात टाकले गेले किंवा ठार मारले. येथील लोकसंख्या वाढीचे प्रमाणही ८४% घटले आहे. वकील रॉडनी डिक्सन म्हणाले, चीनला पहिल्यांदाच या प्रकरणात उत्तर द्यावे लागेल.

0