आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे झिरो कोविड धोरण:कोरोना संसर्गाच्या संशयावरून लोकांना जबरदस्तीने धातूच्या बॉक्समध्ये ठेवले जात आहे, सुमारे 2 कोटी लोक घरांमध्येही कैद

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 कोटी लोक घरात कैद

चीनने कोरोना नियंत्रणासाठी 'झिरो कोविड पॉलिसी' स्वीकारली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चीन सरकार सर्वसामान्यांवर भयंकर अत्याचार करत आहे. याचे उदाहरण शांक्सी प्रांतातील शिआन शहरात पाहायला मिळत आहे. येथे क्वारंटाईन सेंटरच्या नावाखाली लोकांना धातूच्या बॉक्समध्ये ठेवले जात आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाच्या या खुलाशामुळे जगाला धक्का बसला आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांही या बॉक्समध्ये राहण्यास भाग पाडले जात आहे. कोणत्याही भागात एकही कोरोना बाधित आढळला तर त्या भागातील लोकांना या बॉक्समध्ये टाकले जाते. या बॉक्समध्ये लाकडाचा बेड आणि शौचालय उपलब्ध आहे. जास्तीत जास्त दोन आठवडे ते वापरले जाऊ शकतात. अनेक भागात मध्यरात्री लोकांना घरातून बाहेर काढून या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले जात आहे.

2 कोटी लोक घरात कैद
चीनमधील 'ट्रॅक-अँड-ट्रेस' धोरणांतर्गत, पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले जाते. सध्या सुमारे 2 कोटी लोकांना त्यांच्या घरात कैद करण्यात आले आहे. या लोकांना खाद्य पदार्थांच्या खरेदीसाठीदेखील बाहेर पडण्याची परवानगी नाही.

बीजिंगमध्ये विंटर ऑलिम्पिकची तयारी सुरू
पुढील महिन्यात बीजिंग येथे होणाऱ्या विंटर ऑलिम्पिकसाठी चीनची तयारी सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर अधिक कडक निर्बंध लादले जात आहेत. अनेक ठिकाणी लोकांचे खाद्यपदार्थ संपले आहेत, त्यानंतर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीची याचना करत आहेत.

2 ओमायक्रॉन प्रकरणे मिळाल्याने 55 लाख घरात कैद
चीन सरकार कोरोना नियंत्रणाखाली एवढी कडक पावले उचलत आहे की, अनयांग शहरात 2 ओमायक्रॉन संक्रमित आढळल्यानंतरच लॉकडाऊन लागू करण्यात आला. या शहराची लोकसंख्या 55 लाख आहे. यापूर्वी, 1 कोटी 30 लाख लोकसंख्या असलेल्या शिआन शहरात आणि 11 लाख लोकसंख्या असलेल्या युझोउ शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता चीनमधील एकूण 196 कोटी लोकसंख्या लॉकडाऊनमध्ये आहे. मोठ्या प्रमाणावर कोविड तपासणीसाठी हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. चीनमधील कठोर निर्बंधांवरुन वाद निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...