आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO, चिनी अंतराळपटूंची अंतराळात भातशेती:30 सेमी उंच वाढले होते भाताचे रोप, संशोधनासाठी पृथ्वीवर आणणार

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंतराळ व दुसऱ्या ग्रहांवरील सजीवसृष्टी शोधण्यासाठी संशोधक विविध प्रकारचे प्रयोग करत आहेत. या अंतर्गत चिनी अंतराळपटूंना एक मोठे यश मिळाले आहे. त्यांनी अंतराळात धान अर्थात भाताचे रोप उगवण्यात यश मिळाले आहे. चिनी अंतराळपटूंनी भाताच्या दाण्यांपासून ही करामत केली आहे.

याशिवाय त्यांनी थेल क्रेस नामक एक वनस्पतीही उगवण्यात यश संपादन केले आहे. ही वनस्पती पत्तागोभी व ब्रसल्स स्प्राउट सारख्या हिरव्या पालेभाज्यांचे प्रतिनिधित्व करते.

रोपांची वेगवान वाढ झाली

चिनी विज्ञान अकादमीने (सीएएस) सीजीटीएन वृत्तवाहिनीला सांगितले की, एका महिन्यात थेल क्रेसच्या रोपाला काही पाने आली. तसेच लांब देठाची धानाची रोपे 30 सेंटीमीटर व छोट्या देठाची भाताची रोपे 5 सेंटीमीटरपर्यंत वाढले.

चिनी अंतराळवीरांनी अंतरालात विविध प्रकारच्या पालेभाज्या उगवण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, चीनच्या तिआनगोंग अंतराळ स्थानकातील शून्य गुरुत्वाकर्षण प्रयोगशाळेत सुरू असणारे हे प्रयोग अत्यंत यशस्वी ठरलेत.

थेल क्रेसच्या रोपांना काही पाने आली आहेत. आता या वनस्पतींना वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
थेल क्रेसच्या रोपांना काही पाने आली आहेत. आता या वनस्पतींना वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.

काय आहे प्रयोगाचा उद्देश?

प्लांट कल्टिव्हेशन एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून अंतराळ स्थानकात उपस्थित शेनझोउ-14 क्रू अंतराळात धानाच्या रोपाची संपूर्ण लाइफ सायकल अर्थात जीवन चक्राचा अभ्यास करणार आहेत. रोपांची गुणवत्ता अधिक चांगली करण्यासाठी अंतराळातील वातावरणाची कशी मदत घेता येईल, हे संशोधकांना पहावयाचे आहे.

रोप डिसेंबरपर्यंत पृथ्वीवर येणार

सीएसच्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे की, अंतराळात उगवण्यात आलेली रोपे वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरपर्यंत पृथ्वीवर आणली जातील. ही रोपे वाढण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. त्यानंतर त्यांची तुलना पृथ्वीवर उगवण्यात आलेल्या धानाच्या रोपांशी केली जाईल. या रोपांवर आणखी काय संशोधन होणार याची विस्तृत माहिती अद्याप देण्यात आली नाही.

चीनच्या तिआनगोंग अंतराळ स्थानकातील झिरो-ग्रॅव्हीटी लॅबमध्ये हा प्रयोग सुरू आहे.
चीनच्या तिआनगोंग अंतराळ स्थानकातील झिरो-ग्रॅव्हीटी लॅबमध्ये हा प्रयोग सुरू आहे.

चीनने अंतराळात एखाद्या वनस्पतीवर प्रयोग केल्याची ही काही पहिली वेळ नाही. गतवर्षी जुलै महिन्यातही चिनी संशोधकांनी अंतराळात बियाण्यांपासून उगवण्यात आलेल्या धानाच्या पहिल्या बॅचची काढणी केली होती. त्यांनी चांग ए-5 मोहिमेसोबत 40 ग्रॅम तांदूळ पाठवले होते. त्यानंतर पृथ्वीवर त्यांची शेती करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...