आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या मोंटाना राज्यातील आकाशात चीनचा बलून उडताना दिसला. हा हेरगिरीचा फुगा असल्याचे सांगत सर्व सुरक्षा संस्थांना अलर्ट केले आहे. अमेरिकेसह कॅनडानेही संवेदनशील माहिती वाचवण्यासाठी पाऊल उचलले आहे. दोन्हींचे संयुक्त डिफेन्स कमांड याच्यावर लक्ष ठेवून आहेत. अमेरिकी संरक्षणमंत्री लॉइड जे ऑस्टिन यांनी लष्करी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून संभाव्य धोक्याचा आढावा घेतला. दुसरीकडे, चीनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तीन बसमध्ये येऊन हा बलून फोडण्याची तयारी करण्यात आली. पेंटागॉनने बुधवारी बलूनच्या देखरेखीसाठी एफ-२२ लढाऊ विमान पाठवले होते. मात्र, हा खाली कोसळल्यावर नागरिकांचे नुकसान होईल या भीतीने कारवाई लांबणीवर टाकली. विदेशमंत्री अँटनी ब्लिंकेन यांच्या चीन दौऱ्याआधी या घटनेमुळे दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, बलूनमुळे कोणत्याही नुकसानीचा धोका नाही. चीन म्हणाले, कोणत्याही सीमेत घुसखोरीचा उद्देश नाही.
फुगा ज्या क्षेत्रात तेथे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैनात
एअरबेसवर ३४१ वी क्षेपणास्त्र विंग
चीनहून कॅनडाच्या वरून जात हा फुगा पश्चिम-उत्तर अमेरिकेतील मोंटानाच्या आकाशात पोहोचला. मोंटानामध्ये मॅम्स्ट्रॉम एअरबेसमध्ये ३४१ वी क्षेपणास्त्र शाखा आहे. हे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैनात करणाऱ्या तीन एअरबेसपैकी एक आहे. शस्त्रांच्या लाँचिंगची निगराणी करू शकते.
उपग्रहाकडून माहिती घेतोय चीन
सीआयएचे माजी अधिकारी मायकेल पी.मुलरो यांच्यानुसार, फुगा असे काही करण्यात सक्षम नाही, जो आणखी कोणते साधन उदा. उपग्रह आधीपासून पाहण्यास सक्षम नसण्याची स्थिती. चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांकडे अनेक उपग्रह आहेत जे पृथ्वीच्या ३०० किमीवर भ्रमण करत आहेत.
घरापर्यंत धोका
स्पीकर केविन मॅकार्थी यांनी अमेरिकेतील हस्तक्षेपास अस्थिरता निर्माण करणारे पाऊल ठरवले आहे. त्यांनी सांगितले की, बायडेन गप्प बसू शकत नाहीत. डेमॉक्रॅट राजा कृष्णमूर्ती म्हणाले, चिनी धोका अन्य देशांपर्यंत मर्यादीत नाही, हा घरापर्यंत पोहोचला आहे.
हेरगिरीच्या १६० वर घटना
सेंटर फाॅर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजनुसार, २००० नंतर अमेरिकेत चीनकडून हेरगिरीच्या १६० पेक्षा जास्त घटना समोर आल्या. चीनने मोबाइल टॉवर्सवर हुवावेचे हेरगिरीचे उपकरण लावण्याचा कट रचला होता. ग्रामीण भागांना लक्ष्य करत उपकरण लावले होते. हे लष्करी ठिकाणांकडे गेल्यास गुप्तचर संस्थांनी कारवाई केली.
अमेरिका करतेय नाकेबंदी
अमेरिकी संरक्षण विभागाने गुरुवारीच फिलिपाइन्समध्ये लष्करी तळ वाढवण्याचा निर्णय घेतला. संरक्षण तज्ज्ञांनुसार, चिनी लष्कराची नाकेबंदी आणि तैवानवरील हल्ल्याच्या स्थितीत कारवाईसाठी हे आवश्यक आहे. अमेरिकासह जगात चीनने अशी ठिकाणे तयार केली आहेत,ज्याद्वारे आपल्या नागरिकांची हेरगिरी करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.