आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Chinese Espionage | Spying Through Microchips In Household Appliances Like Made In China Laptops, Fridges, Mixers

चिनी हेरगिरी नेटवर्क:मेड इन चायना लॅपटॉप, फ्रिज, मिक्सरसारख्या घरेलू उपकरणांतील मायक्रोचिपद्वारे हेरगिरी

लंडन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटिश सरकारने आपल्या नागरिकांना दिला मोठ्या धोक्याचा इशारा मेड इन चायना लॅपटॉप, फ्रिज, मिक्सरसारख्या घरेलू उपकरणांतील मायक्रोचिपद्वारे हेरगिरी

चीनच्या हेरगिरीचे नेटवर्क जगभरात एवढे पसरले आहे की ब्रिटनसारख्या देशात कोट्यवधी लोकांची खासगी माहिती चुटकीसरशी त्यांना उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी त्यांनी गुप्तहेर ठेवले नसून फ्रिज, लॅपटॉप, मोबाइल किंवा मिक्सर-ग्राइंडरसारखी घरगुती उपकरणेच पुरेशी आहेत.घराघरात वापरल्या जाणाऱ्या चिनी उपकरणांमध्ये बसवलेल्या मायक्रोचिपद्वारे चीन खासगी माहिती चोरत असल्याचे ब्रिटिश सरकारने दीर्घ तपासाअंती सांगितले.

एवढेच नव्हे तर कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिनी पार्ट‌्समध्येही चिप लावण्यात आली आहे. घरात लावलेल्या चिनी एलईडी बल्बमध्येही हेरगिरीचे यंत्र असू शकते, केवळ खासगी हक्क नव्हे तरा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, असा सावधगिरीचा इशारा ब्रिटिश सरकारने मंत्री तसेच नागरिकांना दिला आहे. ब्रिटनच्या अनेक विद्यापीठांनी चिनी कंपन्यांसोबत तंत्रज्ञानविषयक करार केले आहेत. या विद्यापीठातील संशोधनाची माहितीही चिनी कंपन्या चोरी करत असल्याची ब्रिटनला शंका आहे. आफ्रिकी देशांमध्ये हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या बहुतांश कंपन्याचा यात समावेश आहे.

गंभीर चिंतेचे कारण... जगाच्या तंत्रज्ञान बाजारात ५४ टक्के हिस्सा केवळ तीन चिनी कंपन्यांचा
तांत्रिक उपकरणांचा हेरगिरीसाठी वापर होत असल्याचे चव्हाट्यावर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चीनच्या केवळ तीन कंपन्या ‘क्वेक्टेल’ ‘फायबोकॉम’ आणि ‘चायना मोबाइल’ यांचा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या जागतिक बाजारपेठेत ५४ % वाटा आहे. जगातील १० बड्या लॅपटॉप कंपन्या याच तीन कंपन्यांचे पार्ट‌्स वापरतात. दळणवळणाशी संबंधित उद्योगांध्येही या तीन कंपन्यांनी जगाच्या बाजारपेठेत ७५ % वाटा मिळवला आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही कंपन्यांवर चीन सरकारचे नियंत्रण आहे. टेस्लासारख्या मोठ्या कार कंपन्यासुद्धा कनेक्टिव्हिटीसाठी याच तीन कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर करतात.

5-जी नेटवर्कद्वारे महत्त्वाच्या व्यक्ती, संस्थांवर निगराणी
ब्रिटिश सरकारच्या मते, चिनी यंत्रातील हेरगिरी चीप 5-जी नेटवर्कद्वारे ऑपरेट केली जाते. ती चीनमधील विविध सर्व्हरशी जोडली आहे. यात ब्रिटनमधील महत्वाच्या व्यक्ती, संस्था, लष्करी हालचालींची माहिती पोहोचते. चीनच्या बहुसंख्या बड्या कंपन्या सरकारी आहेत. विशेषत: टेलिकॉमशी संबंधित उपकरणे सरकारी कंपन्या बनवतात. या उपकरणांची जगभरात विक्री होते.

जगभरातील प्रत्येक लष्करी हालचालींवर चीनची नजर
अमेरिकेतील शस्रास्रांशी संबंधित बारीकसारीक हालचालीही सहज चीनने मिळवली होती,असे ब्रिटनच्या अहवालात म्हटले आहे. अमेरिका तैवानला कधी,किती आणि कोणती शस्रास्रे पुरवते आहे याची माहिती चीनने आधीच मिळवली होती. शस्रास्र साठा पोहोचण्यापूर्वीच चीनने तैवानच्या चाेहोबाजूला लढाऊ विमाने पाठवली.
लढाऊ जहाजही तैनात केले होते.

उत्पादनांचे फीडबॅक जाणून घेण्यासाठीही केली हेरगिरी
चीनमध्ये २२ वर्षे राजनैतिक अधिकारी राहिलेले काॅर्लेस पार्टन म्हणाले की, चिनी साहित्य ज्या देशात जाते तिथे हेरगिरी होते,असा संशय आहे. केवळ सुरक्षेबाबतच नव्हे तर हा चीनच्या दृष्टीने ग्राहकांची मते जाणून घेण्यासाठीचाही हा एक मार्ग आहे.

दशकापासून या उपकरणांचा हेरगिरीसाठी वापर होतोय
लॅपटॉप, व्हॉईस कंट्रोल्ड स्मार्ट स्पीकर, स्मार्ट वॉच, स्मार्ट एनर्जी मीटर, सीसीटीव्ही कॅमेरे, जगभरात पोलिस यंत्रणेत वापरले जाणारे कॅमेरे, डोअरबेल कॅमरे, कार्ड पेमेंट मशीन, हॉट टब, कार आदी. या सर्व गोष्टी उघड होऊनही अद्याप त्यावर उपाय सापडलेला नाही.

एक्स्पर्ट व्ह्यू
रितेश भाटिया, सायबर सुरक्षा तज्ज्ञ
आपल्या बँक खात्याची माहिती चीनमध्ये जातेय...

हेरगिरी नेटवर्कद्वारे चीन कोणत्याही देशातील प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीची बारीकसारीक माहिती गोळा करते. त्याला सतत अपडेट केले जाते. स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्या बँक खात्याशी संबंधित प्रत्येक माहिती चिनी संस्था गोळा करतात. तुम्ही कुणाला पैसे दिले, किती दिले, आपण पैसा कसा खर्च करतो, आपल्या संपर्कात कोण-कोण आहे, याची सर्व माहिती चीनला सहज उपलब्ध होते.

आपल्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजही चीनमध्ये पोहोचते.
विशेष म्हणजे फोन बंद असला तरीही आपले व्हिडिओ-ऑडिओ रेकॉर्डिंग होत असते आणि हेच सर्वात धोकायदाक आहे. जगभरातील लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्टफोनचे बहुसंख्य पार्टस् ‘चायना मोबाइल’ आणि ‘फायबोकॉम’ कंपन्या बनवतात. त्यामुळे त्यांच्याकडे डेटा अॅक्सेस आहे. भारतात अद्याप डेटा प्रोटेक्शन कायदा बनलेला नाही. त्यामुळे चिनी कंपन्यांना मोकळे रान मिळाले आहे. ब्रिटनसारख्या युरोपीय देशांमध्ये कडक नियम आहेत. तिथून डेटा बाहेर जात असल्याचे आढळल्यास तेथील चिनी कंपन्यांना जगभरातील उलाढालीच्या ४ टक्के दंड ठोठावला जातो. तो अब्जावधी रुपये असू शकतो.

बातम्या आणखी आहेत...