आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Chinese Foreign Minister Says Galvan Valley Is Forcibly Building Roads And Bridges On Our Border With India

चीनचा 4 दिवसात पाचव्यांदा गलवानवर दावा:चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले - गलवान खोरे आमच्या सीमेत, भारत येथे जबरदस्तीने रस्ते आणि पूल बनवतेय

बीजिंग / नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणाले - 15 जूनच्या संध्याकाळी भारतीयांनी करार मोडत एलएसी पार केली आणि चीन सैनिकांवर हल्ला केला
  • 15 जुनच्या रात्री गलवान घाता भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती, यामध्ये 20 जवान शहीद झाले होते
Advertisement
Advertisement

शुक्रवारी रात्री उशिरा चीनने पुन्हा गलवान खोऱ्यावर दावा केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झोऊ लिजियन म्हणाले की गलवान खोरे हा चीनचा भाग आहे आणि लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (एलएससी) आमच्या बाजूला आहे. भारतीय सैनिक जबरदस्तीने येथे रस्ते आणि पूल बांधत आहेत. चीनच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी चार दिवसात पाचव्यांदा सांगितले की, 15 जूनच्या संध्याकाळी भारतीय सैन्याने मुद्दाम एलएसी पार केली आणि करार मोडून चिनी सैन्यांवर हल्ला केला.

लिजियन म्हणाले की, 15 जूनच्या घटनेस भारत जबाबदार आहे. ते म्हणाले की गलवान खोऱ्याची वास्तविक नियंत्रण रेषा चिनी भागात येते. चिनी रक्षक बरेच वर्षे तेथे गस्त घालत आहेत आणि आपले कर्तव्य बजावत आहेत.

मोदी म्हणाले- देशाच्या एक इंच जमिनीवरही कोणी नजर टाकू शकत नाही 
शुक्रवारी सरकारने भारतीय सैनिकांच्या बलिदान आणि गलवानमध्ये चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्याबद्दल सर्वपक्षीय बैठक बोलवली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आम्ही आमच्या सैन्यदलांना पावले उचलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. आपल्या एक इंच जमिनीकडेही कोणी कोणी नजर टाकू शकत नाही. आपल्या सीमेवर कुणीही घुसखोरी केली नाही किंवा चीननेही आपल्या कोणत्याही पोस्टवर कब्जा केलेला नाही. आपले 20 सैनिक शहीद झाले, पण ज्यांनी भारत मातेला आव्हान दिले होते त्यांना धडा शिकवून ते गेले आहे. संपूर्ण देश त्यांचे पराक्रम स्मरणात ठेवेल. त्याच्या बलिदानामुळे सर्वांना दुःख झाले आहे.

Advertisement
0