आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चीनची तऱ्हा:उइगर मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चन समुदायावर अत्याचार, येशूंचे चित्र हटवून जिनपिंग यांचे चित्र लावण्याचा चीन सरकारचा आदेश

बीजिंग3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मे महिन्यात जिनपिंग सरकारने फुझियान प्रांतातील अनेक चर्च तोडल्याचा दावा केला जात आहे
  • एक महिन्यात शेकडो धार्मिक चिन्हे हटवली, विराेधानंतर मारहाण

चीनमध्ये सरकारने उइगर मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. ख्रिश्चन लाेकांनी घरातील भगवान येशू यांचे चित्र व चर्चमधील क्राॅस हटवावे. त्या जागी चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक माआेत्से तुंग व राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची छायाचित्रे लावावीत, असे फर्मान चीन सरकारने काढले आहे.

गेल्या एक महिन्यात अधिकाऱ्यांनी अंशुई, जियांग्सू, हेबई, झेजियांग, अनहुईसह अनेक राज्यांत चर्चबाहेरील शेकडाे धार्मिक चिन्हे बळजबरीने हटवली आहेत. विराेध झालेल्या ठिकाणी धार्मिक चिन्हांची विटंबना करण्यात आली. हुआइनॅन शहराच्या शिवान चर्चमधील धार्मिक चिन्हे काढून टाकण्यात आली. त्यासाठी १०० कर्मचाऱ्यांची टीम क्रेन घेऊन दाखल झाली हाेती. लाेकांनी या गाेष्टीचा विराेध केला. तेव्हा अधिकाऱ्यांनी ८० वर्षीय महिलेसह इतर लाेकांना मारहाण केली. ख्रिश्चन संघटना चायना एडने चर्चवर कारवाईची छायाचित्रे जारी केली. दुसरीकडे इमारतींच्या माध्यमातून धर्माची आेळख हाेता कामा नये. सरकारने देशात समानता आणण्यासाठी धार्मिक चिन्हे हटवण्याचे आदेश दिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याआधी सरकारने धार्मिक पुस्तकांचा वापर व त्याच्या अनुवादावर बंदी आणली हाेती.

धार्मिक ठिकाणी प्रवेश करण्यावर कर

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे ८.५ काेटी कार्यकर्ते आहेत. काेणत्याही धर्माचे पालन करू नये, असे सरकारचे आदेश आहेत. चीनमध्ये सुमारे ४० काेटी बाैद्ध-ताआे, ६.७ काेटी ख्रिश्चन, दीड काेटी मुस्लिम आहेत. त्यांना चर्च, मंदिर, मशिदीबाहेर प्रार्थनेची परवानगी आहे. धार्मिक ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना कर लागू हाेताे.

शिनजियांगमध्ये उइगरांसाठी शेकडाे यातनागृहे

सरकारने पश्चिमेकडील शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांसाठी नजरबंदी असलेली वसाहत तयार केली आहे. येथे तुरुंगासारख्या शेकडाे इमारती आहेत. या यातनागृहांत मुस्लिमांना डांबले जाते. सरकारने देशात इस्लामच्या चिनीकरणासाठी पंचवार्षिक याेजनादेखील केली आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या विचारांनुसार मुस्लिमांना वागवण्याचे चीन सरकारचे धाेरण आहे.