आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

164 कोटींची चोरी:अमेरिकन कोविड फंडात घुसले चिनी हॅकर्स, एपीटी-41 हॅकिंग समूहाची करामत

न्यूयाॅर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन कोविड फंडात चीन सरकारशी संबंधित हॅकर्सनी घुसखोरी केली आहे. हॅकर्स समूहाने कोविड फंडातून १६४ कोटी रुपये (२ कोटी डाॅलर) चोरले. ही चाेरी २००० पेक्षा जास्त खात्यांतून केली आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या हवाल्याने हा खुलासा झाला आहे. वृत्तांनुसार, एपीटी-४१ नावाच्या हॅकिंग समूहाने अमेरिकेतील १२ पेक्षा अधिक राज्यांचे छोटे व्यावसायिक कर्ज व बेरोजगारी निधीवर डल्ला मारला आहे. फसवणूक प्रकरणाच्या १००० पेक्षा जास्त चौकशा विदेशी स्टेट हॅकर्सकडे इशारा करत आहेत.

२०२० च्या मध्यात सुरू झाली होती पैशांची चोरी पैशांची चोरी २०२० च्या मध्यात सुरू झाली. आवाक्यात आलेल्या २,००० खात्यांत ४० हजारांहून अधिक व्यवहार झाले. महामारी फसवणूक वसूली समन्वयक रॉय डॉटसन म्हणाले, ‘हॅकर्सनी सर्व ५० राज्यांना निशाणा बनवले, असा विचार करणे वेडेपणा ठरेल.

बातम्या आणखी आहेत...