आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशिया आणि युरोपमध्ये आपला जम बसवण्याच्या प्रयत्नादरम्यान चीनचे लक्ष आता कॅनडावर आहे. बीबीसीने कॅनडाच्या प्रसार माध्यमांचा हवाला देत सांगितले की, चीनने कॅनडात २०१९ आणि २०२१ मध्ये झालेल्या दोन केंद्रीय निवडणुकीत हस्तक्षेप केला होता. यामध्ये पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना जिंकून देण्यासाठी मदत केली होती. या प्रयत्नांतून सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला नाही.मात्र, पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यंाच्यावरील आरोपांसाठी चौकशीसाठी एक एक राष्ट्रीय सार्वजनिक चौकशी सुरू करण्याचा दबाव आहे. कॅनडाच्या निवडणूक निगराणी संस्थेने सांगितले की, ते चिनी हस्तक्षेपाच्या आरोपाची चौकशी करत आहेत. रिपोर्टनुसार चीनने २०१९ मध्ये ११ उमेदवारांना पाठिंबा दिला. एका प्रकरणात २.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
चीनचेे धोरणावर परिणाम करण्यासाठी अभियान वृत्तानुसार, निवडणूक हस्तक्षेपाचे ऑपरेशन टोरंटोतील चीनच्या वािणज्य दुतावासाने चालवले होते. यामागचा उद्देश खासदारांच्या कार्यालयात आपल्या लोकांना ठेवणे आणि धोरणांवर छाप टाकणे हा होता. हे सिद्ध झाल्यास गुन्हेगारी आरोप लागतील. कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख डेव्हिड विगनेअर्ल्ट म्हणाले की, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटकडे चीनच्या विदेश मंत्रालयापेक्षा जास्त बजेट आहे. यावरच विदेशांत हस्तक्षेपाचा आरोप आहे. यामुळे चिनी राष्ट्रपती युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटला जादूई शस्त्र म्हणतात.
गुप्त शस्त्र : चीनचे युनायटेड फ्रंट डिपार्टमेंट दुसऱ्या देशांत हस्तक्षेपासाठी काम करते अन्य देशांतील हस्तक्षेपामागे चीनचा युनायटेड फ्रंट वर्क विभाग आहे. यामध्ये शिक्षक, बुद्धिजीवी, लेखक, विद्यार्थी, उद्योगपती आणि अन्य प्रभावी लोकांचा समावेश आहे. १९४९ मध्ये माओंनी त्यास देशाबाहेर लागू केले होते. हे दोन पद्धतीने काम करते. प्रथम- कुणी व्यक्ती वा संस्था चीनप्रति उदार असेल तर त्याला जाळ्यात ओढा. दुसरे- जे विरोधात आहेत, त्यांच्याविरुद्ध अपप्रचार करा. हस्तक्षेपाची ही काही उदाहरणे आहेत.
{ब्रिटनमध्ये हस्तक्षेप : गेल्या वर्षी जानेवारीत वृत्त आले होते की, ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआयने इशारा दिला होता की, खासदार धोक्यात आहेत. युनायटेड फ्रंटसाठी काम करणारी चिनी वंशाच्या क्रिस्टीन ली यांची ब्रिटनच्या सत्ता-प्रतिष्ठानांत पकड आहे. त्यांनी चीनसाठी ब्रिटिश धोरणांवर छाप पाडल्याची शक्यता आहे. ली यांनी अनेकदा ब्रिटिश खासदार, पक्ष, उभरत्या नेत्यांना पैसा दिला होता. {क्रिस्टीन ली यांना २०१९ मध्ये ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे पुरस्कार दिला. वृत्त समोर आल्यावर पुरस्कार मागे घेतला. {२०११ मध्ये न्यूझीलंड: यांग जियान यांची संसदेत निवड झाली होती. यांग यांनी त्याआधी १५ वर्षांपर्यंत चीनच्या मिलिटरी इंटेलिजन्ससाठी काम केले होते. खासदार म्हणून त्यांनी चीनच्या बाजूने धोरण बनवण्याचा प्रयत्न केला. {2017 ऑस्ट्रेलिया: सीसीपीशी संबंधित दानदात्यांनी ऑस्ट्रेलियातील अनेक दिग्गज नेत्यांना पैसा दिला होता. याच्या बदल्यात ते ऑस्ट्रेलियाच्या चीन धोरणावर परिणाम करू इच्छित होते. माहिती बाहेर आल्यानंतर लेबर पार्टीचे सीनेटर सॅम दस्तारींनी राजीनामा दिला. {2020 तैवान: राष्ट्रपती निवडणुकीत हान क्यो-यूच्या बाजूने बातम्या द्याव्यात यासाठी तैवान मीडियावर दबाव टाकला {अमेरिका : मध्यावती निवडणुकीत चीन बनावट सोशल मीडिया खात्यांच्या मदतीने आवडीच्या उमदेवारांच्या बाजून वातावरण निर्मिती करत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.