आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Chinese Lunar New Year Celebration | Shooting At Chinese Lunar New Year Celebration In US; 10 Civilians Killed, 19 Injured

अमेरिकेत चिनी न्यू इयर उत्सवात गोळीबार:10 नागरिक ठार, 19 जखमी; कर्णकर्कश संगीतात गोळ्यांचा आवाज ऐकू आला नाही

वॉशिंग्टन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात चिनी नववर्ष स्वागताच्या उत्सवादरम्यान अंधाधुंद गोळीबार झाला. ही घटना मोंटेरी पार्कमध्ये रविवारी पहाटे ३.३० वाजता झाली. यामध्ये १० नागरिकांचा मृत्यू तर १९ जखमी झाले. गोळीबाराचे कारण स्थानिक लोक आणि आशियाई समुदायातील हिंसाचार मानले जात आहे. यामध्ये १७ वर्षीय चिनी तरुण मारला गेला. मोंटेरी पार्कची लोकसंख्या ६० हजार आहे. येथे ६५% आशियाई राहतात. यात बहुतांश लोकसंख्या चिनी वंशाच्या नागरिकांची आहे. येथे दोन दिवस उत्सव सुरू होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय संस्था एफबीआयला घटनास्थळी पाठवले आहे.

कर्णकर्कश संगीतात गोळ्यांचा आवाज ऐकू आला नाही
घटनेदरम्यान संगीत मोठ्या आवाजात सुरू होते. आतषबाजी सुरू होती. परिणामी, गोळ्यांचा आवाज आणि जखमींच्या किंकाळ्या ऐकू आल्या नाहीत. काही वेळाने जखमी पळताना दिसल्याने काय घडले ते कळाले. येथे जवळपास १० हजार लोक उपस्थित होते. अशा स्थितीत रुग्णवाहिका पोहोचण्यात अडचणी आल्या.

बातम्या आणखी आहेत...