आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरात चीन सर्वात जास्त वेळ झोपणे आणि सवैतनिक कामासाठी देतो. तेथील लोक सरासरी ९.२ तास झोपतात. रोज ३१५ मिनिटे काम करतात. कोरियाचे लोक सर्वात कमी ७.५१ तास झोपतात. भारत आणि अमेरिकेचे लोक सरासरीपेक्षा एक तास जास्त झोपतात. २४ तासांच्या दिनचर्येत फ्रान्सचे लोक खाण्यापिण्यात सर्वाधिक आणि अमेरिकेचे लोक सर्वात कमी वेळ घालवतात. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) ने जगातील ३३ देशांच्या १५ ते ६४ वर्षांच्या लोकांच्या सवयी आणि जीवनशैलीचा अभ्यास केला, त्यात ही बाब समोर आली.
अहवालात म्हटले आहे की, प्रत्येक देशाच्या लोकांची दिनचर्या वेगळी असते, पण काम करणे आणि झोपण्यातच लोक सर्वाधिक वेळ व्यतीत करतात. चीन आणि मेक्सिकोचे लोक दिवसभरात इतर देशांच्या तुलनेत दुप्पट सवैतनिक काम करतात, तर इटली आणि फ्रान्सचे लोक सर्वात कमी. सवैतनिक काम करण्यात चीन भलेही अव्वल असला तरी जपानचे लोक त्यासाठी सर्वाधिक ३२६ मिनिटे खर्च करतात. मात्र, जपानमध्ये कार्यसप्ताहादरम्यान सर्वाधिक ओव्हरटाइम असतो. घरगुती कामात मेक्सिकोचे लोक सर्वाधिक तीन तास खर्च करतात. एखाद्या देशाचे लोक कामासाठी किती वेळ देतात हे त्या देशाची भौगोलिक संरचना, शिक्षणाचा स्तर आणि त्याची आर्थिक रचना यावर अवलंबून आहे. दक्षिण कोरियाचे लोक वाचनासाठी सर्वाधिक सरासरी ५७ मिनिटे देतात. जर्मनीचे लोक शॉपिंगला जास्त वेळ देतात. अवैतनिक कामांत पुरुषांच्या तुलनेत महिला तिप्पट वेळ खर्च करतात, असेही आढळले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.