आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 लाख मृत्यू होण्याची शक्यता:चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना “झीरो कोविड’चे परिणाम भोगावे लागणार

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तीन वर्षांपर्यंत कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नानंतर अखेर हार पत्करत माघार घेतली. आता टेस्टिंगच सेंटर बंद केले जात आहेत. झीरो कोविड धोरण मागे पडले आहे. सरकार कोविडविरोधी आघाडीवरून गायब झाले आहे. यादरम्यान अन्य देशांनी लोकांना लसीने सुरक्षा कवच दिले. विषाणूविरोधी मार्गदर्शकतत्त्वे जारी केले. चीनकडे हे सर्व करण्यासाठी बराच वेळ होता. पहिली लस यशस्वी ठरल्यानंतर चीनने तयारी केली नाही. या सर्व स्थितीत चीनमध्ये महामारीमुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. लसीचा दर काय आहे आणि किती प्रभावी आहे, आयसीयू खाटा किती आहेत आणि मृत्यूदर काय आहे, यावरून हा अंदाज बांधला आहे. त्याआधी चीनला औषधाचा साठा,खाटांची संख्या वाढवावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...