आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीननेच वुहान येथील प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू विकसित केला आणि तेथूनच जगभर त्याचा संसर्ग झाला असा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेतील दुरचित्रवाहिनी फॉक्स न्यूजने गुरुवारी सूत्रांच्या आधारे दावा केला की, चीनी संशोधक अमेरिकेच्या संशोधकांपेक्षा कितीतरी पुढे आहेत हे दाखवण्यासाठी चीनने विशिष्ट हेतूने वुहानच्या लॅबमध्ये हा विषाणू तयार केला. चीने हा विषाणू जैविक अस्त्र म्हणून नव्हे तर जगाला आपली ताकद दाखण्यासाठी निर्माण केला होता. कोरोनासारख्या घातक विषाणूंची आम्हाला अमेरिकेपेक्षा चांगली ओळख आहे आणि त्यावर नियंत्रणही ठेवता येते हे दर्शवण्याचा चीनने प्रयत्न केला. हा चीनचा आजवरचा सर्वात महागडा आणि गुप्त कार्यक्रम होता.
फॉक्स न्यूजने एका सूत्राचा हवाला देत म्हटले की, डॉक्टरांचे प्रयत्न आणि प्रारंभीच्या काळात या विषाणूवर लॅबमध्येच नियंत्रण मिळवण्यासंबंधीच्या काही कागदपत्रांच्या अभ्यासावरून हे लक्षात येते की, वुहानच्या ज्या वेट मार्केटमधून कोरोनाचा प्रसार झाला असे मानण्यात येते, तेथे वटवाघळांची विक्रीच होत नाही. लॅबवर होणाऱ्या आरोपांना दिशा देण्यासाठीच चीनने वेट मार्केटचा मुद्दा जाणूनबुजून पसरवला.
विषाणू लॅबमध्ये तयार झालेला नाही, जागतिक आरोग्य संघटनेनेही केली आहे खातरजमा : चीनचे उत्तर
वुहान येथील लॅबमधून जाणीवपूर्वक विषाणूचा प्रसार करण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपानंतर गुरुवारी चीनने खुलासा केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते, झाओ लिजियन म्हणाले की, जगातील २० लाखाहून अधिक लोकांना बाधित करणारा कोरोना विषाणू हा लॅबमध्ये तयार झालेला नसल्याची खातरजमा जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) केली आहे.
तणाव वाढणार : आता चीनकडून अणुचाचणीचा अमेरिकेला संशय
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी म्हटले की, चीनने सीटीबीटी कराराचे पालन करण्याचा दावा केला असतानाही गुप्तरित्या कमी शक्तीचा अणुस्फोट केल्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आधीपासूनच बिघडलेले या दोन देशांचे संबंध या दाव्यानंतर अधिकच तणावपूर्ण होऊ शकतात. चीनच्या लोप नूर या अणुचाचणी स्थळावर मागील वर्षी मोठ्या प्रमाणात हालचाली दिसल्या होत्या त्यामुळेच अमेरिकेच्या मनात ही शंका आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.