आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती भीषण झाली आहे. येत्या काही महिन्यांत 21 लाख लोकांचा मृत्यू होईल, असा दावा केला जात आहे. बीजिंगच्या स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. अशा वेळी चीनची प्रसिद्ध गायिका झेन झांगने जाणीवपूर्वक स्वत:ला कोरोनाचा संसर्ग करवून घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली.
गायिकाने कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती देताच, लोकांनी तिच्यावर टीका सुरू केली. यानंतर झांगने पोस्ट डिलीट केली. तसेच जनतेची माफीही मागितली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गायिका झांगने चिनी सोशल मीडिया वीबोवर माहिती दिली. तिने सांगितले की ती स्वतः जाणीवपूर्वक ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट BF.7 ने संक्रमित झाली. तिच्या मैत्रिणींना कोरोनाच संसर्ग झाल्यानंतर ती त्यांच्या घरी गेली आणि त्यांची गळाभेट घेतली. ती बराच वेळ त्यांच्यासोबत राहिली.
याच्या एका दिवसानंतर तिला घसा खवखवण्याचा त्रास झाला आणि ताप आला. तिची चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह झाल्याचे निष्पन्न झाले.
जाणीवपूर्वक संक्रमित होण्यासाठी अजब युक्तिवाद
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तिचा एक संगीताचा कार्यक्रम आहे. तेव्हा तिला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून तिने आधीच अशा प्रकारे संक्रमित होऊन स्वतःला बरे करून घेतले. या खुलाशानंतर तर लोक आणखीनच भडकले आणि तिच्यावर टीका करायला लागले. ट्रोलिंग वाढल्यावर गायिकेने लोकांची माफी मागत पोस्ट डिलीट केली.
या बातम्याही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.