आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Chinese Space Rocket Crashes Into Pacific Ocean, Spain Closed Airspace Over Threat, Fourth Such Incident In 2 Years

प्रशांत महासागरात कोसळले बेलगाम चिनी रॉकेट:धोक्यामुळे स्पेनने बंद केला होता एअरस्पेस, 2 वर्षांत चौथ्यांदा घडली अशी घटना

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी अंतराळात 'बेलगाम' झालेल्या चिनी रॉकेटचा 23 टन ढिगारा प्रशांत महासागरात कोसळला. युनायटेड स्टेट्स स्पेस कमांडने ट्विट करून ही माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये, यूएस स्पेस कमांडने म्हटले की, "युनायटेड स्टेट्स स्पेस कमांडने खात्री केली आहे की, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना लाँग मार्च 5B रॉकेट दक्षिण-मध्य पॅसिफिक महासागरावर पहाटे 4:01 वाजता वातावरणात रिएंट्री केली."

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरून प्रक्षेपित केलेले उपग्रह आणि रॉकेट कधीकधी अवकाशात अनियंत्रित होतात. त्यांचा ढिगारा जमिनीवर पडतो.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरून प्रक्षेपित केलेले उपग्रह आणि रॉकेट कधीकधी अवकाशात अनियंत्रित होतात. त्यांचा ढिगारा जमिनीवर पडतो.

वास्तविक, चिनी रॉकेटच्या अयशस्वी प्रक्षेपणानंतर शास्त्रज्ञांनी अलर्ट जारी केला होता. या इशाऱ्यानंतर स्पेनने अनेक विमानतळांचे एअरबेस बंद केले. शास्त्रज्ञांनी इशारा दिला होता की, अनियंत्रित 23 टन वजनाचे चिनी रॉकेट पृथ्वीच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. त्याचा ढिगारा कधीही पृथ्वीवर पडू शकतो, त्यामुळे अनेक देशांनाही गंभीर धोका होता.

चीनचे रॉकेट मेंगशान सोमवारी दुपारी दक्षिणेकडील हेनान बेट प्रांतातील वेनचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून पाठवण्यात आले. या रॉकेटला स्पेस स्टेशनवर पोहोचण्यासाठी 13 तास लागले असते, असा दावा चिनी शास्त्रज्ञांनी केला आहे. मेंगशानचे वजन सुमारे 23 टन, उंची 58.7 फूट आणि जाडी 13.8 फूट होती.

5 नोव्हेंबरला वातावरणात ध्वस्त होण्याची शक्यता होती

5 नोव्हेंबरला हे रॉकेट वातावरणात कोसळेल आणि त्याचा ढिगारा तुटून पृथ्वीवर कुठेही पडू शकेल, असा अंदाज यापूर्वीच शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. ते या अंदाजाच्या आधीच कोसळले आहे. चीनचे रॉकेट बेलगाम होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी या वर्षी जुलैमध्येही चीनचे रॉकेट प्रक्षेपित झाल्यानंतर पृथ्वीवर परतले होते. त्यानंतर या चिनी रॉकेट लाँग मार्च 5Bचे अवशेष मलेशिया आणि आसपासच्या देशांमध्ये पडले होते.

नासाने म्हटले - चीनची कृती बेजबाबदारपणाची

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) म्हटले आहे की, चिनी अंतराळ अधिकाऱ्यांनी हा धोका निर्माण केला आहे. नासाने यापूर्वी अनेकदा चीनच्या अशा कारवाया बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.

2 वर्षांत चौथ्यांदा अशी घटना

चिनी रॉकेटचा अवशेष जमिनीवर पडण्याची दोन वर्षांतील ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 30-31 जुलैच्या रात्री रॉकेटचे काही तुकडे पृथ्वीवर पडले होते. 25 टन वजनाच्या या रॉकेटने 24 जुलै रोजी चीनचे अपूर्ण राहिलेले तियांगॉन्ग स्पेस स्टेशन पूर्ण करण्यासाठी मॉड्यूलसह ​​झेप घेतली होती. याबाबत शास्त्रज्ञांनीही चिंता व्यक्त केली होती. यापूर्वी रॉकेटचे अवशेष मे 2021 मध्ये हिंदी महासागरात आणि मे 2020 मध्ये आयव्हरी कोस्टवर पडले. मात्र, दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नव्हती.

काय आहे रॉकेटच्या ढिगाऱ्याचा धोका?

द एअरोस्पेस कॉर्पोरेशनच्या मते, पृथ्वीच्या वातावरणात जळत नसलेला मलबा लोकवस्तीच्या भागात पडू शकतो, परंतु या ढिगाऱ्यापासून हानी होण्याची शक्यता फारच कमी आहे. अमेरिकेच्या ऑर्बिटल डोबरीज मिटिगेशन स्टँडर्ड प्रॅक्टिसेसच्या 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, रॉकेट अनियंत्रितपणे पृथ्वीवर पुन्हा प्रवेश केल्यास एखाद्याला दुखापत होण्याची शक्यता 10 हजारांपैकी एक आहे.

बातम्या आणखी आहेत...