आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेनंतर आता लॅटिन अमेरिकेच्या आकाशातही एक बलून उडताना दिसला आहे. शुक्रवारी रात्री पेंटागॉनचे ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी म्हटले की, आम्हाला वृत्त मिळत आहे की, आणखी एक बलून लॅटिन अमेरिकेकडून येत आहे. ते म्हणाले - आमचा अंदाज आहे की हा आणखी एक हेरगिरी बलून आहे, जो चीनचा आहे.
वास्तविक, गुरुवारी अमेरिकेच्या मोन्टाना शहरातही एक हेरगिरी बलून दिसला होता. तो इंटेलिजन्स गॅदरिंग म्हणजेच गुप्त माहिती गोळा करणारा बलून असल्याचे पेंटागॉनने म्हटले होते.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांनी आपला चीन दौरा रद्द केला आहे.
स्पाय बलूनमुळे चीन-अमेरिकेचे संबंध बिघडले
अमेरिकेच्या आकाशात चीनचे हेरगिरी बलून आल्याने दोन्ही देशांत राजनयिक संकट निर्माण झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांनी चीन दौरा रद्द केला आहे. ते रविवारपासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार होते.
तिकडे, चीनने आपल्या विधानात म्हटले आहे की अमेरिका ज्याला गुप्त माहिती गोळा करणारा बलून म्हणत आहे ते केवळ एक नागरी एअरशिप आहे, जे आपल्या नियोजित मार्गावरून भरकटले आहे. याचा वापर केवळ हवामानाची माहिती गोळा करण्यासाठी होतो.
याच्या प्रत्युत्तरात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले - जर हे नागरी बलून आहे तर ते 6 हजार किलोमीटर दूर मोंटानापर्यंत कसे आणि का पोहोचले. पेंटागॉनने म्हटले - हे अमेरिकेत हेरगिरीसाठी पाठवण्यात आले होते.
अमेरिकेत आलेल्या बलूनचा आकार 3 बसएवढा
अमेरिकन अधिकाऱ्यांनी अजूनही सांगितले नाही की चीनचे बलून किती मोठे आहे. तथापि, याचा शोध घेण्यासाठी सैन्याने आपले 2 एफ-22 फायटर जेट पाठवले. यानंतर एबीसी न्यूजला एका अधिकाऱ्याने सांगितले की हा बलून तीन बसएवढा मोठा आहे.
आता हा बलून कुठे आहे?
अमेरिकेने हा बलून नष्ट करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे तो अजूनही त्यांच्याच हवाई हद्दीत आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार जनरल रायडर यांनी म्हटले आहे की याचे लोकेशन सामान्यांसोबत शेअर केले जाणार नाही. तथापि, ते म्हणाले की तो अजूनही अमेरिकेच्या मधोमध आहे.
उपग्रहाद्वारे हेरगिरी
सीआयएचे माजी अधिकारी मायकल पी मुलरोंचे म्हणणे आहे की बलून असे काही करण्यास सक्षम नाही, जे दुसरी कोणतीही साधने जसे की उपग्रह आधीपासूनच देत नाही. दोघांकडे अनेक उपग्रह आहेत, जे आधीपासूनच पूर्ण माहिती गोळा करत आहेत.
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडिजनुसार 2000 नंतर अमेरिकेत चीनकडून हेरगिरीच्या 160 घटना समोर आल्या आहेत. चीनने मोबाईल टॉवर्सवर हुवावेची हेरगिरी उपकरणे लावल्याचा कट रचला होता. ग्रामीण भागांना निशाणा बनवताना आपली उपकरणे लावली होती. ते सैन्य ठिकाणांकडे आल्यावर गुप्तचर संस्थांनी कारवाई केली.
अमेरिकाही करत आहे चीनची घेराबंदी
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने गुरूवारीच फिलिपिन्समध्ये सैन्य तळ वाढवण्याचा निर्णय घेतला. संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनी सैन्याला घेरणे आणि तैवानवर हल्ल्याच्या स्थितीत कारवाईसाठी हे गरजेचे आहे. यापूर्वी अमेरिकेसह जगात चीनने अशी ठिकाणे बनवली आहेत, जी आपल्या नागरिकांची हेरगिरी करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.