आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनने जगातील सर्वात उंच शिखर माऊंंट एव्हरेस्टची उंची पुन्हा एकदा मोजली. २७ दिवस चाललेल्या या सर्वेक्षणाचा उद्देश- जगभरात माऊंट एव्हरेस्टच्या योग्य उंचीची माहिती देणे असा आहे. यासाठी चीनकडून ८ सदस्यांचे पथक तिबेटमार्गे बुधवारी एव्हरेस्टच्या शिखरावर पोहचले. चीनने दिलेल्या माहितीनुसार, माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४४.४३ मीटर इतकी आहे. तर नेपाळने मोजलेली उंची ८८४८.१३ मीटर इतकी होती. शास्त्रज्ञांनी एक मेपासून माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी सर्व्हे सुरु केला. नेपाळने उंची योग्य पद्धतीने मोजलेली नाही, असा चीनचा दावा होता. चीनच्या सर्व्हेयरनी आजवर माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचे सहा चक्र पूर्ण केले. १९७५ व २००५ मध्ये दोन वेळा अनुक्रमे ८८४८.१३ व ८८४४.४३ मीटर उंची सांगितली होती.
शिखरावर विक्रमी १५० मिनिटे थांबले
माऊंट एव्हरेस्टवर पोहचलेले पथक पर्वत शिखरावर १५० मिनिटे थांबले. या पथकाने चीनी लोकांचे पर्वतावर थांबण्याचस विकम मोडला आहे. दरम्यान, पथकाच्या सदस्यांनी २० चौरस मीटर रुंद शिखरावर सर्व्हेचे निशाण लावले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.