आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यामुळे खवळलेला चीन अत्यंत आक्रमक झाला आहे. तैवानला त्याने ६ बाजूने वेढा देत आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसराव सुरू केला आहे. या सरावात त्यांनी गुरुवारी डोंगफोंग श्रेणीतील क्षेपणास्त्रेही डागली. ही क्षेपणास्त्रे तैवानच्या उत्तर, दक्षिण व पूर्व भागात डागली. युद्ध सरावात चीनच्या युद्धनौका, प्रगत लढाऊ विमानांसह हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे.
चीनने या लष्करी कवायतीला ‘लाइव्ह फायरिंग’ असे नाव दिले आहे. हा सराव तैवानी सीमेपासून केवळ १६ किमी दूर केला जात आहे. तो ७ ऑगस्टपर्यंत चालेल. यात खरी शस्त्रे व दारुगोळ्याचा वापर केला जात आहे. यापूर्वी चीन हा सराव तैवानपासून सुमारे १०० किमी दूर करत होता. यादरम्यान तैवानने म्हटले आहे की, आम्ही चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहोत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, आम्हाला तणाव नकोय. देश युद्धस्थितीच्या विरोधात आहे. आमची युद्धाची इच्छा नाही, पण त्यासाठी सज्ज राहू. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनने अप्रत्यक्षरीत्या मोठा युद्ध सराव सुरू केला असला तरी तो याचे मोठ्या युद्धात रूपांतर करणार नाही. सोबतच तैवानवर निर्बंधही लावणार नाही. याचे कारण तैवानमधील चिप व सेमी कंडक्टर निर्मिती आहे. जगात ४७ लाख कोटी चिप, सेमीकंडक्टरची बाजारपेठ आहे. पैकी अर्ध्याहून जास्त चिप, सेमीकंडक्टरची निर्मिती तैवानमध्ये होते. चीनला याच चिप व सेमी कंडक्टरची निर्यात केली जाते.
सज्जता : तैवानकडे आहेत २५ लाख गनिमी योद्धे -अमेरिकेचे तैवानसोबत अधिकृतरीत्या राजकीय संबंध नाहीत, पण तो तैवान रिलेशन्स अॅक्टअंतर्गत त्यांना शस्त्रे विकतो. यात म्हटले की, तैवानच्या स्वसंरक्षणासाठी अमेरिका मदत करेल. चीनने हल्ला केल्यास अमेरिका तैवानचा बचाव करेल, असे अमेरिकन राष्ट्रपती गेल्या वर्षीच म्हणाले होते.
-तैवानने चीनचा सामना करण्यासाठी अॅसिमेट्रिक वाॅरफेअर पद्धतीचा अवलंब केला आहे. याला पार्कुपाइन स्ट्रॅटेजीही म्हणतात. याचा उद्देश हल्ल्याला शत्रूसाठी अधिकाधिक कठीण व महाग बनवणे आहे. तैवानने विमानभेदी, रणगाडाभेदी आणि जहाजभेदी शस्त्रे व दारूगोळ्याचे मोठे भांडार जमवले आहेत. -मल्टिलेयर्ड सी डिफेन्स भेदून चिनी सैनिक पोहोचले तरी तैवानने शहरांमध्ये गनिमी युद्धाची तयारी केली आहे. तैवानच्या राखीव सैन्यात २५ लाख लोक आहेत व १० लाख सिव्हिल डिफेन्स व्हाॅलंटियर आहेत. ते गनिमी युद्ध करू शकतात.
सेमीकंडक्टरमध्ये तैवानच किंग देशभागीदारी तैवान 64% द. कोरिया 16% चीन 9% अमेरिका 6% इस्रायल 1.3% अन्य 2%
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.