आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तैवान:62 दिवसांपासून कोमात होता चियू, भावाने आवडत्या पदार्थाचे नाव उच्चारताच आला शुद्धीवर

तैपेई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रस्ते अपघातात जखमी झाल्याने कोमात गेला होता युवक

आवडत्या पदार्थाचे नाव ऐकताच अनेकांच्या लोकांच्या तोंडात पाणी येते. मात्र, यामुळे कोमात असलेला माणूस शुद्धीत येऊ शकतो असे तुम्ही कधी ऐकले आहे का? अशीच घटना तैवानमध्ये समोर आली आहे. तेथे आवडत्या पदार्थाच्या उल्लेखाने मुलाला कोमातून बाहेर काढले आहे. ६२ दिवसांपर्यंत कोमात असलेला १८ वर्षांचा चियू आश्चर्यजनक पद्धतीने शुद्धीत आला.

वायव्य तैवानमधील चियू जुलैत स्कूटर अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याला प्राणघातक जखमा झाल्या होत्या. गंभीर अवस्थेत दाखल मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे प्रकृतीत सुधारणा झाली, मात्र तो कोमात गेला. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ तो कोमात राहिला.

चियूवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, जेव्हा त्याला रुग्णालयात आणले तेव्हा तो वाचण्याची आशा खूप कमी होती. त्याची डावी किडनी, लिव्हर व इतर अवयवांना इजा झाली होती. अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने रक्त वाहत होते. रुग्णालयात त्याच्यावर सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. चियू त्याच्या मजबूत इच्छाशक्तीच्या आधारे वाचला, मात्र तो कोमात गेला.

चिकन फिलेटचे नाव ऐकताच हालचाल सुरू
६२ दिवसांपर्यंत कोमात होता. एके दिवशी चियूचा मोठा भाऊ त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात आला असता त्याने गमतीत मी तुझ्यासाठी तुझे आवडते चिकन फिलेट खाणार असल्याचे सांगितले. चियूच्या आवडत्या पदार्थाचा उच्चार केल्याने त्याच्या शरीराची हालचाल झाली. काही वेळानंतर तो पूर्णपणे शुद्धीवरही आला. नंतर चियूला रुग्णालयातून सोडण्यात आले.