आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिसमसचे काऊंटडाऊन सुरू:इंग्लंड: मँचेस्टरच्या जगप्रसिद्ध ख्रिसमस बाजाराला आला बहर

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपीय देशात ख्रिसमसचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. लोकांनी ख्रिसमची जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये ख्रिसमसचा जगप्रसिद्ध बाजार १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. तो २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या बाजारात २२० हून अिधक स्टॉल लावले जात आहेत. लोकांनी विनासायास ख्रिसमसची खरेदी करावी हा त्यामागचा हेतू. संपूर्ण बाजारात रंगीबेरंगी एलइडी दिव्यांचे चांदणे पडले आहे. दुसरीकडे नानाविध प्रकारच्या आकर्षक लायटिंगद्वारे बाजारात वेगळीच झगमग दिसत आहे. गेल्या २४ वर्षांपासून मँचेस्टरमध्ये हा ख्रिसमसचा बाजार सजत आहे.

स्केट मँचेस्टरचेही आयोजन यावेळी कॅथेड्रल गार्डनमध्ये स्केट मँचेस्टरचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे स्केटर्स एका सुंदर ख्रिसमस ट्री च्या चोहोबाजूंना स्केटिंग करू शकतील. प्रकाश, जिंजरब्रेडचा सुगंध आणि ख्रिसमसचा आनंद त्यांना घेता येईल. शिवाय ख्रिसमसची गाणीही ते ऐकू शकतील.

बातम्या आणखी आहेत...