आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Christmas In Corona Pandemic : Last Year A Community Of Millions, This Year The Safety Of Millions Of People Is More Important

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळात नाताळ:गतवर्षी लाखोंचा समुदाय, यंदा लाखो लोकांची सुरक्षा जास्त महत्त्वाची

व्हॅटिकन सिटी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाताळ मानवतेसाठी शांतीचा स्रोत बनावा : पोप

भारतासह जगभरात शुक्रवारी नाताळची धूम दिसून आली. चर्चमध्ये सकाळपासूनच प्रार्थना सभा सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या चालल्या. कोरोना काळ असल्याने व्हॅटिकन सिटी, बेथलहेमसह जगभरातील अनेक देशांत नाताळचा दरवर्षीसारखा उत्साह दिसला नाही. पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स बेसिलिका चर्चमध्ये केवळ १०० लोकांच्या उपस्थितीत नाताळ साजरा केला. गेल्या वर्षी येथे जगभरातील लाखो लोक सहभागी झाले होते. सामान्यपणे येथे १० हजार लोक उपस्थित असतात. परंतु व्हॅटिकनच्या इतिहासात पहिल्यांदाच नाताळला केवळ १०० लोकांचा सहभाग होता. यंदा कोरोनामुळे संसर्गाची भीती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे व्हॅटिकनच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लोकांचा हिरमोड झाला आहे.

नाताळ मानवतेसाठी शांतीचा स्रोत बनावा : पोप

पोप फ्रान्सिस आपल्या संदेशात म्हणाले, नाताळ आपल्या सर्वासाठी जीवन-विश्वास, स्वीकृती-प्रेम, संवाद, क्षमा, बंधुभाव व संपूर्ण मानवतेसाठी शांतीचा स्रोत बनावा. नाताळच्या दिवशी व्हॅटिकन सिटीमध्ये लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...