आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Christmas In Corona Pandemic : Only Vital Services Available In Italy, Ban On Parties In Africa; Sanctions Imposed In Britain, Unhindered Riots In Brazil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनामध्ये नाताळ:इटलीत केवळ जीवनावश्यक सेवा उपलब्ध, आफ्रिकेत पार्ट्यांवर बंदी; ब्रिटनमध्ये निर्बंध लागू, ब्राझीलमध्ये विना अडथळा जल्लोष

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेरूमध्ये वाहनास मनाई, लेबनॉनमध्ये क्लबची परवानगी, नृत्यावर बंदी

जगभरात आज नाताळ साजरा हाेताेय. काेराेना महामारीच्या काळात वेगवेगळ्या देशात उत्सवाचे स्वरूपही वेगवेगळे राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी कडक निर्बंध आहेत. काही ठिकाणी प्रचंड सवलती आहेत. जणू संसर्ग नसल्यासारखे चित्र आहे. पेरूमध्ये नाताळच्या दिवशी वाहन चालवण्यास मनाई आहे. लेबनाॅनमध्ये नाइट क्लबला जाता येईल, परंतु तेथे नृत्य मात्र करता येणार नाही. नाताळच्या रात्रभाेजनात लाेकांनी एकत्र येण्यासंबंधीदेखील वेगवेगळे नियम आहेत. चला, प्रमुख देशांत नाताळ कसा साजरा केला जाताेय हे पाहूया.

अमेरिका : सतर्क राहण्याचा सल्ला

अमेरिकेत राष्ट्रीय स्तरावर कडक निर्बंधांची कोणतीही घोषणा झाली नाही. राज्यांना नियम तयार करण्याची सूट दिली गेली. नाताळच्या सुट्या दरम्यान ८.५ काेटी अमेरिकी प्रवास करतील. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २९ टक्के कमी आहे.

दक्षिण आफ्रिका : बंद राहणार बीच

दक्षिण आफ्रिकेतही नवे स्ट्रेन सापडले आहेत. नाताळच्या दिवशी तेथे बीच बंद राहणार आहेत. . इटली रेड झाेनमध्ये समाविष्ट आहे. नाताळच्या दिवशी भाेजन व औषधी व्यतिरिक्त दुकाने बंद राहतील.

ब्रिटन : आता कडक निर्बंध

ब्रिटनने नाताळाच्या दरम्यान सवलती देण्याची तयारी केली हाेती. तीन कुटुंबांना साेबत जल्लाेष करण्याची परवानगीही दिली हाेती. काेराेनाचे दाेन नवे स्ट्रेन समाेर आल्यानंतर ही याेजना रद्द करण्यात आली. बहुतांश रुग्णालये रुग्णांनी भरलेली आहेत.

ब्राझील : जल्लाेषाची परवानगी

ब्राझीलमध्ये नाताळच्या दिवशी कोणतेही राष्ट्रव्यापी निर्बंध लागू झालेले नाहीत. रिओ-दी-जानेरिओचे बहुतांश हॉटेल, रेस्तराँ बुक आहेत. वास्तविक साओ पावलाेमध्ये केवळ जीवनावश्यक सेवा उपलब्ध असतील.

इंडोनेशियाच्या पालेमबांगमध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला चर्चची निर्जंतुकीकरण करताना कर्मचारी. देशात लाेकांना चर्चमध्ये जाण्याची परवानगी आहे.

नव्या वर्षानिमित्त भारतातील नियम

> राजस्थान : नवीन वर्षानिमित्त पार्टी, फटाके, ७ वाजता बंद राहतील बाजार.

> गुजरात : सार्वजनिक प्रार्थना किंवा सभा नाही. अधिकारी करतील निगराणी

> महाराष्ट्र : रात्री ११ वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी

> दिल्ली : चर्च परिसरात सामान्य जल्लोष, रात्रीच्या पार्ट्यांवर बंदी

> कर्नाटक : २ जानेवारीपर्यंत ११ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी

> उत्तराखंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी पार्टीची परवानगी नाही. तमिळनाडूत ३१ डिसेंबर, १ जानेवारीला सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी. ओडिशात ३१ डिसेंबरला सेलिब्रेशनवर बंदी.

बातम्या आणखी आहेत...