आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाताळच्या तयारीला सुरुवात:फ्रान्ससह जगभरात नाताळचा झगमगाट सुरू

पॅरिस6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात नाताळच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, सिंगापूरमध्ये हा उत्साह दिसतो. छायाचित्र फ्रान्सची राजधानी पॅरिसचे आहे. येथील एका वसाहतीचा मार्ग ख्रिसमस ट्रीसह रोषणाईत न्हाऊन गेला आहे. हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. जगाची फॅशन कॅपिटल अशी आेळख असलेल्या पॅरिसमध्ये इमारती सजू लागल्या आहेत. यंदा येथे काही भागात ख्रिसमस ट्री उलटे लावण्यात आले आहेत. नाताळच्या निमित्ताने काही देखावे दिसतील. दुकानांतून लावलेल्या पडद्यांवर मॉन्स्टर शोही आयोजित होतील.

मासिक उत्पन्नाच्या १५६ टक्के खर्च होणार : एका अभ्यासानुसार जगभरात नाताळच्या निमित्ताने लोक आपल्या मासिक उत्पन्नाच्या तुलनेत १५६ टक्के जास्त खर्च करतील. लेबनॉनमध्ये सर्वाधिक ६८८ टक्क्यापर्यंत खर्च होईल. नेदरलँड्समध्ये सर्वात कमी १९ टक्के असेल.

बातम्या आणखी आहेत...