आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन:संपात ख्रिसमसच्या भेटवस्तू अडकल्या, पोस्टात ढीग, संप आणखी सुरूच राहणार

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये संप सुरूच आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या ४८ तासांपासून कामबंद ठेवले आहे. यामुळे रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. ख्रिसमसआधी संप पुकारल्यामुळे गिफ्ट आणि पार्सलचा मोठा ढीग साचला आहे. यामुळे लोकांना वेळेत गिफ्ट मिळण्यात अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ करण्याच्या मागणीसाठी संप केला आहे. कारण, वाढत्या महागाईमुळे जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. रेल्वे संघटनांनी सरकारला वेतन व कामाच्या स्थितीचा नवा प्रस्ता फेटाळला आहे. ब्रिटनच्या बहुतांश सार्वजनिक सेवा रद्द केल्या आहेत. सरकार महत्त्वाच्या सार्वजनिक सेवांत लष्कर तैनात करण्याच्या विचारात आहे. ख्रिसमस गिफ्टनिमित्त दुकान, हॉटेल आणि रेस्तराँ व्यवसाय नुकसानीत सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

परिचारिका संपावर, रुग्णालयात गर्दी ब्रिटनच्या ७६ रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांतील १ लाख परिचारिक संपावर असल्याने रुग्णालयात गर्दी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...