आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय 56, दिसतो 25 चा:सिंगापूरच्या हॉट मॉडेलची इंटरनेटवर जबरदस्त क्रेझ, फोटो पाहून तुमचाही बसणार नाही विश्वास

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळ कधी, कोणासाठी थांबत नाही असे म्हणतात. पण सिंगापूरमध्ये राहणार्‍या चुआंदो टॅनला हे लागू होत नाही. त्याच्याकडे बघून असे वाटते की त्याचा काळ काही वर्षांपूर्वी थांबला आहे आणि त्यामुळेच त्याचे वयही थांबले आहे.

त्याला पाहून कोणीही त्याच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. हल्ली सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत आणि त्याचे फोटो पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.

वयाची 56 वर्ष ओलांडूनही तो एका पंचवीशीतल्या तरूणासारखाच दिसतो. तसेच त्याचे फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असे आहे. या व्यक्तीला पाहून आजन्म तारुण्याचे वरदान लाभलेले आहे, असे आपण म्हणू शकतो. त्यांच्या या फिटनेसचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते कायमच उत्सुक असतात.

तो फिटनेस फ्रिक आहे. त्याचे शर्टलेस फोटो पाहून आपल्याल त्याचा अंदाज येईल की तो जीमही करतो. चुआंदो टॅनच्या फिटनेसचे सर्वात मोठे रहस्य हे आहे की, जेवण हे प्रोटीन अर्थात प्रथिनांनी भरपूर असावे हा त्याचा हट्ट असतो. प्रोटीन हे शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही.

चुआंदो टॅनचे हे म्हणणे आहे की, शरीराला रोज ठराविक मात्रामध्ये पाणी मिळायलाच हवे. खूप पाणी पिणे हा स्वस्थ राहण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे. सकाळी नाश्त्यांमध्ये तो 6 उकडलेली अंडी फक्त 2 अंड्यातील पिवळ बलक (कोलेस्टेरॉलमुळे) खातो. या माध्यमातून खूप उर्जा आणि प्रथिने मिळतात, असे तो सांगतो. शिवाय, तो एक ग्लास दूध पितो आणि काहीवेळा नाश्त्यामध्ये बेरीसह एवोकॅडो घेतो.

टॅनचा असा विश्वास आहे की, त्याची 70 टक्के शरीरयष्टी डाएटवर आधारित आहे, तर फक्त 30 टक्के व्यायामावर आधारित आहे.

आपले वजन नियंत्रित राहावे म्हणून इतरही पौष्टिक पदार्थांचे मापात सेवन करतो. दिवसभरातील आपल्या जेवणात तो भातासोबत चिकन, ग्रील्ड भाज्या आणि फिश सूप घेतो. तर रात्रीच्या जेवणात ताज्या हिरव्या भाज्यांनी बनवलेले सॅलड खातो.

तसेच तो धूम्रपान करत नाही, दारू पीत नाही आणि कॉफी आणि चहा देखील टाळतो. चुआंदो टॅनला आईस्क्रीम फार आवडते.

टॅनचा जन्म 1967 मध्ये झाला आहे. 1980 च्या दशकात त्याने मॉडेल म्हणून काम केले. 90 च्या दशकात तो एक पॉप गायक देखील होता.

यानंतर त्याने फोटोग्राफीदेखील केली. 2017 मध्ये एका चिनी वृत्तसंस्थेने चुआंदोवर स्टोरी केल्यानंतर तो व्हायरल झाला होता.

चुआंदो टॅनने 2019 मध्ये 'प्रिशियस इज द नाईट'मधून अभिनयात पदार्पण केले. सध्या टॅनचे इन्स्टाग्रामवर 1.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि त्याने आजपर्यंत 632 पोस्ट केल्या आहेत.

टॅन हा 56 वर्षांचा आहे हे अगदी खरे आहे. कॅलेंडरमधली वर्ष सरली, काळानुसार बदल होत गेले, मात्र तो तसाच आहे. त्याच्याकडे पाहून वय फक्त एक अकडा असल्याचे वाटते.

बातम्या आणखी आहेत...